शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे भातपीक धोक्यात : दुबार भात पेरणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 23:50 IST

पाऊस रुसल्याने वसईतील बळीराजा संकटात सापडला आहे. कडक उन्हात भात रोपांना पाणी न मिळाल्याने ती करपण्याची स्थितीत असून आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट बळीराजा पुढे उभे राहणार आहे.

पारोळ - पाऊस रुसल्याने वसईतील बळीराजा संकटात सापडला आहे. कडक उन्हात भात रोपांना पाणी न मिळाल्याने ती करपण्याची स्थितीत असून आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट बळीराजा पुढे उभे राहणार आहे.रोहिणी मृग नक्षत्र, संपले तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्व मोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भात रोपांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकामधील रोपे करपण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.वसईत पेरणी झालेल्या सर्व भागात ही समस्या उद्भवली आहे. या जमिनीत उगवण झालेल्या नर्सरी रोपांची अवस्था पाण्याअभावी गंभीर बनली आहे. सततच्या पावसात रोपे टिकाव धरतात, असे असताना मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुरुवातीला तीन-चार दिवस पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेल्या भाताला अंकुर फुटले आहेत. तापलेल्या जमिनीत पावसाच्या सरींचा शिडकाव होताच ही रोपे उगवतात. मात्र, त्यानंतरही पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागतो आहे. सध्या अधूनमधून एखादी सर पडते, तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस सुरू न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन शेतकºयांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीVasai Virarवसई विरार