शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबमधील रिसॉर्टमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 05:36 IST

एका शाळकरी मुलीला कळंब येथील रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने बलात्कार केल्यानंतर काढलेले फोटो दाखवून धमकी दिल्याचीही पिडीतीची तक्रार आहे.

वसई : एका शाळकरी मुलीला कळंब येथील रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने बलात्कार केल्यानंतर काढलेले फोटो दाखवून धमकी दिल्याचीही पिडीतीची तक्रार आहे.पिडीत मुलगी व बलात्कार करणारा आरोपीही बोरीवली येथील असून तिच्या परिचयाचा आहे. मात्र, मुलीला त्याने पहिल्यांदा जून महिन्यात कळंब येथील रिसॉर्टमध्ये आणून बलात्कार केला. त्यावेळी काढलेले फोटो दाखवून धमकावत त्याने त्यानंतर तिच्यावर अनेकवेळा त्याच रिसॉर्टमध्ये अनेकदा अत्याचार केला. त्यामुळे कंटाळलेल्या पिडीतेने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कळंब येथे मीरा रोड येथील एका महिलेला अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक करून तीनही तरुणींची सुटका केली होती.शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे, पोलीस उप निरीक्षक पाटील, पोलिस नाईक सांगळे, महिला पोलीस नाईक राजगुरु यांच्या पथकाने सापळा रचला होता. त्यावेळी कळंब गावात एका ओला गाडीत एक महिला तीन तरुणींसोबत बसलेली आढळून आली. पोलिसांनी बोगस गिºहाईक पाठवून सौदा करून महिलेला पैसे दिले. त्यामुळे महिलेने मुलींना देहविक्रीसाठी आणल्याचे उजेडात आणले.खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाने काशिमीरा येथील आलीशा अब्दुल खान (२५) या महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांना बोईसर येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी तिला या आरोपीविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. कळंब राजोडी परिसरात अनेक बेकायदा रिसॉर्ट सुरु आहेत. त्याठिकाणी गैरधंदे केले जात असल्याचा आरोप अ़नेकदा करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात अर्नाळा सागरी पोलिसांनी देहविक्रीसाठी आणण्यात आलेल्या तरुणीची सुटका केली होती. आता एका शाळकरी मुलीवर कळंब येथील रिसॉर्टमध्ये गेल्या चार महिन्यांपासून बलात्कार केला जात असल्याची बाबही उजेडात आली आहे. त्यामुळे देहविक्रीसाठी मुलींना रिसॉर्टमध्येच घेऊन जात असल्याचे आता लपून राहिलेले नसल्याने रिसॉर्टमध्ये अनैतिक धंदे सुरु असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.पोलीस घालतात पाठिशीरिसॉर्ट चालक आणि पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्याची उघड चर्चा या परिसरात सुरु आहे. त्यामुळेच रिसॉर्टमध्ये अनैतिक धंदे सुरु असतात.देहविक्रीसाठी आणलेल्या मुली बाहेर पकडल्या गेल्याचे दाखवून पोलीस रिसॉर्ट चालकांना पाठिशी घालीत असल्याचा आरोपही करण्यात येतो.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा