शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

पन्नास लाखांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा, व्याजाने दिले पैसे, ८० लाखांची वसुली केल्यानंतर केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:16 IST

पालघर तालुक्यातील पालघर पूर्व येथील दिवाण अँड सन्स उद्योग मधील एका कंपनी मालकाकडून ५० लाख रु पयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पालघरमधील अंबालाल गंभीरलाल जैन याच्याविरु द्ध पालघर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

पालघर : तालुक्यातील पालघर पूर्व येथील दिवाण अँड सन्स उद्योग मधील एका कंपनी मालकाकडून ५० लाख रु पयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पालघरमधील अंबालाल गंभीरलाल जैन याच्याविरु द्ध पालघर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे.दिवाण अँड सन्स उद्योग भागामध्ये स्वत:ची संदीप इंडस्ट्रीज नामक केमिकल कंपनीचे मालक संदीप मोदी यांनी आरोपी अंबालाल जैन यांच्याकडून २०१२ व २०१३ साली ३७ लाख रु पये उसनवारीने घेतले होते. मोदी यांचेकडून अंबालाल जैन याने कोणताही परवाना नसताना दिलेल्या रक्कमेवर अवैध पद्धतीने दरमहा १ लाख ७० हजार अशी ५ टक्के दराने व्याजाची रक्कम मागितली.मोदी यांनी गेल्या सात वर्षात दरमहा १ लाख ७० हजारप्रमाणे ८० लाखाची रक्कम अंबालाल यास आजतागायत दिलेली आहे व पुढच्या वर्षभरात मोदी यांनी ३० लाख रु पये एकरकमी देऊन हा हिशोब संपवून टाकीन असे जैन यास कबूल केले होते. मात्र अंबालाल याने मोदी यांच्या कंपनीत जाऊन त्यांना धमकी देऊ लागला व मोदी यांच्याकडून अतिरिक्त ५० लाख रु पयाची मागणी करू लागला व ती रक्कम न दिल्यास तुझ्या विरोधात माझ्या पत्नीची छेड काढल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी अंबालाल याने मोदी याना दिली.अंबालाल याच्या जाचाला कंटाळून मोदी यांनी पालघर पोलिसांकडे धाव घेतली व पालघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासणीत पालघर पोलिसांना तथ्यता आढळताच पोलीस निरीक्षक किरण कबाडी व त्यांच्या सहकार्यांनी आरोपी अंबालाल जैन यास त्याच्या घरातून गुरु वारी अटक केली.तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा...आरोपी अंबालाल जैन याच्या विरु द्ध आधीही गुन्हे दाखल असल्याचे व तो गुन्हेगार प्रवुत्तीचा असल्याचे पोलिसांनी म्हटले असून त्याच्याविरु द्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. अंबालाल जैन यांच्या विरोधात पालघर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा