शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

विक्रमगडमध्ये गणपती कारखान्यांमध्ये रंगरंगोटीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:19 IST

गणपतीच्या आॅर्डर वाढल्या असल्याची व्यापारी बंधूंची माहिती, जीएसटीमुळे किमती वाढणार

- राहुल वाडेकरविक्रमगड : बाप्पाच्या आगमनाला आजपासुन फक्त २४ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने शहरातील गणपती कारखान्यांमध्ये लगबग पहावयास मिळत आहे. वाढलेली गणपतींची संख्या, पडणारा पाऊस आणि डेटलाईनच्या गणितामुळे रात्रंदिवस काम सुरुआहे.या चित्रशाळांमध्ये गणेशाच्या विविध प्रकारातील सुंदर आणि आकर्षक अशा गणेशमुर्ती तयार केल्या जात असून त्या पाहाण्यासाठी व त्याची बुकींग करण्यासाठी आतापासुनच गणेशभक्तांची व विशेषकरुन शालेय विद्यार्थ्यांचीही गर्दी पहावयास मिळत आहे. विक्रमगडमधील काही चित्रशाळेत तयार मुर्ती आणुन त्यांना रंगरंगोटी केली जाते तर काही मुर्ती बनविल्या जातात. त्यामध्ये शाडूच्या मातीच्या मुर्तीही बनविल्या जातात. परंतु आताचे युग हे धावपळीचे व आधुनिक युग असल्याने प्लॅस्टर आॅफ पॅरीसची मुर्तीची मागणी जास्त असल्याचे येथील मुर्तिकार सांगतात.तालुक्यातील अनेक ग्राहकांनी (गणेशभक्तांनी) चित्रांप्रमाणे बसलेल्या हुबेहुब गणेशमुर्तींची मागणी केली आहे़ त्यामुळे प्रत्येक ग्राहकांला आवडणाऱ्या गणेशमुर्ती या शाळेमध्ये बनविल्या जात आहेत. तुलनेने शाडुच्या मुर्तीची मागणी जरी कमी असली तरी ती बनविण्यासाठी जात वेळ खर्ची पडतो. शिवाय ती नाजूक असल्याने खूप सांभाळावे लागते. या मुर्ती बनविण्यास त्या सुकण्यास व आखणी करण्यास खूप वेळ लागतो व तसे कारगीरांचीही आवष्यकता असते़ त्यामुळे सध्या त्या आॅर्डर बूक करुनच केल्या जातात. यंदा गतवर्षी पेक्षा गणेशमुर्ती बनविण्याच्या साहित्यात, रंगांत दुपटीने भाव वाढ झाल्याने मुर्तींच्या किंमतीही वाढलेल्या पहावयास मिळणार आहेत.१९८४ मध्ये मातीची एक गोण ४ रुपये किंमतीला मिळत होती, ती आता १००० रुपयात मिळत आहे. रंगाचे दर त्यावेळी १ रुपया ४० पैसे एक डबी होती ती आता ३०० रुपयाचे आसपास झाली आहे़ तर कारागीरही मिळत नसल्याने त्यांची मजुरी, वीज व साहित्यात झालेली महागाई तर गणेशमुर्तीना जीएसटी कर देखील द्यावा लागणार आहे़ दरम्यान त्याचा कोणताही परिणाम बुकींगवर झाला नसून ती वाढतच आहे.प्लास्टर आॅफ पॅरिसचा बोलबाला तरी शाडूमूर्ती आॅन डिमांडगेल्या काही वर्षीमध्ये बदलत्या काळानुरुप मातीत मुर्ती घडविणारे कारागीरच मिळत नसल्याची माहिती विक्रमगड येथील गणेशचित्र शाळेतील व्यापारी बंधुनी यांनी सांगीतले. त्यामुळे गुणतवणूक वाढली आहे. गणेशमुर्तीची किंमत ही कलावंताचे कौशल्य,त्यांचे नाव, काम करण्याची पध्दत आणि भाविकांची श्रध्दा यावर अवलंबुन असते. गत काही वर्षांमध्ये प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मुर्तीना मागणी वाढत आहे.मात्र, कित्येक पटीने शाडूच्या मुर्तींना मागणी आहे़ शाडूच्या गणेशमुर्ती शास्त्र सम्मत व पर्यावरण पुरक असल्याने महाग असूनही त्यांची मागणी चांगली आहे. शहरातून व परिसरातून त्यांना चांगली मागणी आहे.किंमती वाढणार : यंदाची महागाईची झळ बसत असल्याने त्याचा परिणाम मुर्तीसाठी लागणारी माती व रंगावर दिसत आहेत. साहित्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने साहजिकच गणेशमुर्तीच्या किंमती वाढल्याचे व्यापारी बंधुनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :ganpatiगणपतीGanpati Utsavगणपती उत्सव