शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राजवली खाडी स्वच्छता एप्रिलअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:51 IST

पुराच्या आठवणीचा धसका; तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर

वसई : जुलै महिन्यातील मुसळधार पावसात शहरातील पाणी वाहून न जाण्याचे मुख्य कारण राजवली खाडीतील मातीचा भराव व लोखंडी पूल ही कारणे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने तो अडथळा त्यावेळी दूर केला होता. मात्र चालू वर्षात जुलै २०१८ सारखी पूरपरिस्थीती पुन्हा उद्भवू नये म्हणून आतापासूनच राजवली खाडीतील गाळ काढण्यास व रूंदिकरणास पालिकेने सुरूवात केली आहे.या कामासाठी तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर करण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. राजावली खाडीवरील अनिधकृत भरावं व बांधलेला पुलं व त्यामूळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन औद्योगिक वसाहतीचे झालेले १५० कोटीचे नुकसान, १२०० एकर मिठागरात पुराचा पाणी गेल्यामुळे झालेली करोडो रु पयांची हानी, राजावली खाडीत रसायनिमश्रित पाणी सोडले जात असल्याने होत असलेले प्रदूषण अशी अनेक कारणांमूळे राजावली खाडी प्रकाशझोतात आली होती.वसई विरार शहर महानगरपालिका शहर स्वच्छता विभागामार्फत विविध योजना प्रभावी पणे राबविल्या जात आहेत.पाण्याचा निचरा होऊन रस्त्यावर पाणी तुंबू नये याकरीता तसेच नाले सफाई करीता सन २०१९-२० मध्ये १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.वसई-विरारमधील नाल्यांची एकूण संख्या १५० असून त्यांची लांबी १८७ किमी. आहे. या नालेसफाईसाठी खर्च गतवर्षी साडेचार कोटी रुपये होता.छोट्या गटारांची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली असून नालेसफाईही पूर्ण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सांगितले होते.तरीही जुलै महिन्यातील पावसामूळे शहरातील नाल्यांतून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही व शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली.यावर्षी तशी परिस्थितीपुन्हा उद्भवू नये म्हणून पालिका नालेसफाईवर लक्ष ठेऊन आहे.तिवरांच्या झाडांना धक्का न लावता नालेसफाईया अगोदर शहरांतर्गत नालेसफाईवर भर दिला जात होता. त्यावर पाच ते साडेपाच कोटी खर्च होत होता. मात्र, आता ज्या नाल्यांतून शहरातील पाणी खाडीला जाऊन मिळते त्या नाल्यांतील गाळ काढणे व खाडीचे रूंदिकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचा अतिरिक्त खर्च चार कोटी रूपयांच्या आसपास आहे. खाड्यांतील गाळ काढण्यासाठी पोकलन मशीन व तराफ्यांचा वापर करण्यात येत असून एप्रिल अखेरपर्यंत नालेसफाई केली जाणार आहे. वसई पूर्व येथील खाडी नायगांव पर्यंत साफ करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी तिवरांची झाडे आहेत त्यांना धक्का न लावता नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.