शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी योजनेची ओळखपत्रे भिजून नष्ट

By admin | Updated: August 28, 2015 23:17 IST

केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी आरोग्य निरामय योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गलथान कारभार होत आहे.

वसई : केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी आरोग्य निरामय योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गलथान कारभार होत आहे. याबाबतची आलेली पत्रे एका आरोग्य केंद्रात भिजत पडली आहेत. वास्तविक ही ओळख पत्रे असून महा-ई सेवा केंद्रातर्फे वाटप करण्यात येत असतात. परंतु ती वाटप न झाल्यामुळे पावसात भिजून नष्ट झाली आहेत.गरीबांना वैद्यकीय खर्च परवडत नसल्यामुळे तत्कालीन संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गरजु व्यक्तींना वैद्यकीय खर्च करण्यासाठी केंद्राकडून दिड ते दोन लाखाचे अनुदान दिले जाते. गरजू व्यक्तीने या योजनेअंतर्गत असलेल्या इस्पितळात हे ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना वैद्यकीय खर्चातील काही टक्के भाग केंद्र सरकार उचलत असते. वसईत आलेली ही ओळखपत्रे आजही नवघर आरोग्य केंद्रामध्ये पावसात भिजत पडली आहेत. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी ए. डी. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही ओळखपत्रे नवघर मध्ये पडून असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.