शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागातील प्रश्न जैसे थे, पिडीत खलाशांचे कुटुंब आजही वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:20 IST

एकीकडे पालघर जिल्हा मुख्यालयाचा भूमिपूजन समारंभ सोहळा बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ घातला आहे. तर दुसरीकडे या जिल्ह्याच्या सीमा भागात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यात प्रशासन

अनिरुद्ध पाटीलडहाणू : एकीकडे पालघर जिल्हा मुख्यालयाचा भूमिपूजन समारंभ सोहळा बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ घातला आहे. तर दुसरीकडे या जिल्ह्याच्या सीमा भागात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिकांना या सोहळ्याबद्दल कौतुक नसल्याचे चित्र आहे.पालघर जिल्ह्याच्या उत्तरेस महाराष्ट्र गुजरात सीमा भागात डहाणू आण ितलासरी तालुका वसला आहे. येथे रोजगार संधीच्या मर्यादेमुळे आदिवासी युवक वर्षातील आठ महिन्यांसाठी स्थलांतरित होत आहे. गुजरात राज्यातील मासेमारी बंदरात खलाशी म्हणून काम करताना बोट बुडून होणाºया अपघातामुळे अनेकांना जीवास मुकावे लागले आहे. मात्र सीमेपलीकडील नियमांचा हवाला देऊन पिडीत कुटुंबीयांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जात असल्याने दैनावस्था सहन करावी लागते आहे. आजही बहुतांश खलाशी बायोमॅट्रिक कार्डपासून वंचित आहेत.आश्रमशाळांची स्थिती बाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. ३० आॅक्टोबर रोजी अस्वाली येथील आश्रमशाळेत तांदूळ नसल्याची बाब स्थानिकाच्या चौकसनजरेने हेरली आणि हे प्रकरण बाहेर पडल्याने अधीक्षक, मुख्याध्यापकांना धावपळ करून धान्याची तजवीज करावी लागली. अन्यथा निवासी ३०० विद्यार्थ्यांना अर्धेपोटी किंवा उपाशीच राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे येथील धान्य पुरवठा आणि अन्नाचा दर्जा या बाबत चौकशी नेमण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आण िआदिवासी विकासमंत्री या प्रकरणी चौकशी लावतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बोर्डी विजयस्तंभापासून या आश्रमशाळेपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा परिसर डॅमनजीक आणि पश्चिम घाटालगत असल्याने जंगलाने वेढला आहे. परंतु येथे संरक्षक भिंत नसल्याने वन्य प्राण्यांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. येथील नव्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी दिवसाढवळ्या वीज चोरी केली जात आहे.बोर्डी, घोलवड, झाई या मोजक्या ग्रामपंचायती वगळता अन्य गावं पाणी पुरवठा योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे हगणदारी मुक्तीचा वसा घेतलेल्या नागरिकांना पाण्याविना शौचालयात कसे जावे ही चिंता सतावते आहे. शौचालायचे बांधकाम करून दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अनुदानाची रक्कम खात्यात जमा झालेली नाही. घोलवड गावातील पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून चौकशीची मागणी केली आहे. परंतु याबाबत चालढकल केली जात असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस