शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

तीन उद्योग बंद तर 21वर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:56 IST

तारापूर एमआयडीसीमधील दोन मोठे कापड तसेच एका रासायनिक उद्योगावर बंदची तर सुमारे २१ उद्योगांवर दंडात्मक रक्कमेची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली आहे.

पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील दोन मोठे कापड तसेच एका रासायनिक उद्योगावर बंदची तर सुमारे २१ उद्योगांवर दंडात्मक रक्कमेची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली आहे. काही प्रमाणात झालेल्या आणि सध्या सुरु असलेल्या विशेष पथकाचा पाहणी तसेच तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक उद्योगांवर कारवाई होण्याची टांगती तलवार असल्याने बहुसंख्य उद्योगांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, १३ आणि १४ नोव्हेंबरला राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशान्वये पाच जणांच्या विशेष समितीनेही तारापूरच्या प्रदूषणासंदर्भात पाहणी दौरा केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्लोबल या रासायनिक कारखान्यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तर मंधना डार्इंग व पाल फॅशन लि. या कपडा उद्योगावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे बंदची कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य २१ उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मापदंड न पाळल्याने दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाच्या अनुषंगाने म.प्र.नियंत्रण मंडळाने बजावलेल्या आहेत.या कारखान्यांमधून सांडपाणी सोडणे गरजेचे होते, ते न सोडल्याने प्रदूषणाची हानी झाली. पर्यायाने पर्यावरणाचा ºहास केला म्हणून या नोटिसा बजावल्या आहेत. यात मोठ्या उद्योगांना एक कोटी, मध्यम ५० लाख तर लघु उद्योगांना २५ लाख रुपये रकमेच्या दंडाचा समावेश आहे. दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाच्या (एन.जी.टी.) आदेशान्वये आय.आय.टी. (मुंबई) आय.आय.एम (अहमदाबाद) व निरी अशा उच्च दर्जाच्या (टेक्निकल टीम) समितीच्या सदस्यांनी केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बुधवार आणि गुरुवार (दि.१३ व १४) अशी सलग दोन दिवस तारापूर औद्योगिक क्षेत्रातील २५ एम.एल.डी. क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र (सी.ई.टी.पी.) नवापूर, दांडी, उच्छेळी येथील खाडी किनारा तसेच परिसरातील कूपनलिका (बोअरवेल) नाले इत्यादींची पाहणी केली.एन.जी.टी.च्या आदेशान्वये ही समिती प्रथमच तारापूरला आली होती. या टीमने स्वतंत्रपणे पाहणी करावी, असे निर्देश असल्याने त्या समितीने अखिल भारतीय मांगेला समाज या याचिकाकर्त्यांनाही बरोबर घेतले नाही. मात्र पुढील पाहणी दौºयाच्यावेळी अ.भा.मांगेला समाजाच्या प्रतिनिधींना बरोबर घेण्यात यावे, अशी अपेक्षा याचिकाकर्ते व माजी सरचिटणीस नरेंद्र नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. तारापूर औद्योगिक क्षेत्रातून प्रक्रिया न करता मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येत असल्याने त्याचा किनारपट्टी, शेतजमीन आणि नागरिकांवर गंभीर परिणाम होतो.>दिवाळीनंतर दुसºया टप्प्यातील तपासणीअखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे चार वर्षांपूर्वी याचिका दाखल केल्यानंतर अनेक सुनावण्यांदरम्यान लवादाने दिलेले विविध आदेश व सप्टेंबरमध्ये दिलेल्या निर्णयानंतर विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकाने तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील लाल व नारिंगी अशा सुमारे ६०० उद्योगांमधील रासायनिक सांडपाणी व हवा प्रदूषणासंदर्भात विशेष तपासणी मोहिमेचा (सर्वेक्षण) >पहिला टप्पा९ सप्टेंबरपासून सुरु केला होता.पहिल्या टप्प्यात सुमारे २०० उद्योगांमध्ये तपासणी मोहीम राबविली तर उर्वरीत तपासणी दुसºया टप्प्यात दिवाळीनंतर सुरु केली असून त्यामध्ये आठ टीम कार्यरत असून या दोन्ही टप्प्यांचा तपासणी अहवाल अजून प्रलंबित आहे, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती करवाई करण्यात येणार आहे.