शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बससेवेसाठी जनआंदोलन आक्रमक, ५ डिसेंबरला एसटीची बससेवा पुर्णपणे बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:14 IST

मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि वसई विरार महापालिका वसईकरांना बससेवा देत नाही. ग्रामीण भागातील बससेवा पहाटे ३ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत पुन्हा सुरळीत करावी, अन्यथा वसईत उग्र आंदोलन होईल, असा इशारा जनआंदोलन समितीने दिला आहे. यात वसईच्या प्रांताधिका-यांनी मध्यस्थी केली आहे.

वसई : मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि वसई विरार महापालिका वसईकरांना बससेवा देत नाही. ग्रामीण भागातील बससेवा पहाटे ३ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत पुन्हा सुरळीत करावी, अन्यथा वसईत उग्र आंदोलन होईल, असा इशारा जनआंदोलन समितीने दिला आहे. यात वसईच्या प्रांताधिका-यांनी मध्यस्थी केली आहे.एसटी महामंडळाने वसई आणि नालासोपारा एसटी डेपोतून सुटणाºया शहरी बससेवा टप्याटप्याने बंद करण्यास सुरुवात केली आहे. येत्या ५ डिसेंबरला एसटीची बससेवा पुर्णपणे बंद होणार आहे. बंद असलेल्या मार्गावर वसई विरार महापालिकेने बससेवा सुरु केल्या आहेत. मात्र, परिवहनची बससेवा एसटीच्या शेड्यूल्डनुसार नसल्याने प्रवाशी संतप्त झाले असून जनआंदोलन समितीने बससेवा पूर्ववत सुरु व्हावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.एसटीने विद्यार्थी आणि प्रवाशांना मासिक पासेसही बंद केले असल्याने त्यांची गैरसोय होत असल्याकडे आंदोलनाच्या नेत्यांनी लक्ष वेधले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वसईचे प्रांताधिकारी दीपक क्षिरसागर यांनी एक बैठक बोलावली होती. त्यात वसई एसटी डेपो मॅनेजर ठाकरे, नालासोपारा एसटी डेपो मॅनेजर भोसले, विभागीय निरीक्षक चौधरी, परिवहन ठेकेदाराचे प्रतिनिधी हेमंतकुमार वझे यांच्यासह जनआंदोलन समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, डॉमणिका डाबरे, विनायक निकम, प्रफुल्ल ठाकूर, जॉर्ज फरगोज, विन्सेंट परेरा, एव्हरेस्ट डाबरे, जितू मेहेर, मयांक शेठ हजर होते.सेवा देणे बंधनकारकहायकोर्टाच्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि महापालिकेच्या परिवहन यांना वसईत प्रवाशी सेवा देणे बंधनकारक आहे.मात्र, दोघांनीही हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचा आरोप याचिकाकर्त्या डॉमणिका डाबरे यांनी केला आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप