शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनसंदर्भातील जनसुनावणी गुंडाळली; पर्यावरण संस्था संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:25 IST

प्रकल्प रद्द करण्याची मागणी

वसई : बहुचर्चित मुंंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ज्यांच्या जमिनी अधिग्रहित होऊन ज्यांना नोटीस देण्यात आली आहे, त्यांच्यासाठी मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पर्यावरण संवर्धन समिती, भूमिपुत्र बचाव संघटना आदी संस्थांना त्याची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी याला प्रचंड विरोध करत ही सुनावणी गुंडाळली.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन’ संदर्भातील जनसुनावणी मंगळवारी सकाळी ११ वाजता वसई पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याची माहिती पर्यावरण संवर्धन समिती, भूमिपुत्र बचाव संघटना आणि इतर नागरिकांना मिळताच तेही तेथे हजर झाले. कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे ती पुन्हा एकदा गुंडाळण्यात आली.जनसुनावणीची कोणतीही माहिती आम्हाला न देता शासन आमची सपशेल दिशाभूल करीत असल्याची संतप्त प्रतिक्रि या संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली. या जनसुनावणीस सामोरे जाताना पर्यावरण संवर्धन समिती समन्वयक समीर वर्तक यांनी बुलेट ट्रेन आमच्या हिताची नसल्याचे सांगितले. तसेच कुणालाही न सांगता जनसुनावणी ठेवलीच कशी? बुलेट ट्रेनसाठी जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका याआधीही आम्ही घेतली असताना आता पुन्हा अशा सुनावण्या घेऊन सरकारला काय साध्य करायचे आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. म्हणूनच ही जनसुनावणी रद्द करण्याचे आवाहनही केले.उपस्थित आदिवासी एकता परिषद पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्ता सांबरे यांनी आदिवासी समाजाला त्रास देऊ नका असे सांगत बुलेट ट्रेनला विरोध केला. तसेच उपस्थित बाधित शेतकऱ्यांनीही जमीन देण्यास विरोध केल्याने उपजिल्हाधिकाºयांनी सर्वांचा बुलेट ट्रेनला विरोध आहे, असे नमूद करून शेवटी ही जनसुनावणी संपविली. जनसुनावणी नंतर भूमिपुत्र बचाव आंदोलन, पर्यावरण संवर्धन समिती आणि आदिवासी एकता परिषदेतर्फे बुलेट ट्रेन रद्द करा या मागणीची पत्रेही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.या जनसुनावणीसाठी वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे, वसई तहसीलदार किरण सुरवसे तसेच पर्यावरण संवर्धन समितीतर्फे फारूक मुल्ला, विक्रांत चौधरी, अभिजित घाग, दर्शन राऊत, आदिवासी एकता परिषदेच्या वसई तालुका उपाध्यक्ष वंदना जाधव व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक, स्वाभिमानी वसईकरचे रॉजर परेरा आणि विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.वसई पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेली बुलेट ट्रेन संदर्भातील जनसुनावणी ही नियम १६ क नुसार ज्यांच्या जमिनी जात आहेत आणि ज्या धारकांना तशा नोटिसी देण्यात आल्या आहेत, त्यांच्यासाठी होती. तर संवर्धन समिती आणि भूमिपुत्र संघटना यांनी म्हटले की, आम्हाला बुलेट ट्रेन नको. वास्तविक, हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे, तरीही आम्ही सुनावणीवेळी समिती आणि संघटना प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे सभा उधळून लावली असे म्हणणे संयुक्तिक नाही.- स्वप्नील तांगडे, वसई उपविभागीय अधिकारी

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन