शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जनसुनावणी रद्द नाही, मात्र अन्य मुद्द्यांबाबत न्यायालय सकारात्मक, याचिका उशिरा दाखल केल्याचे कारण : अहवालाबाबत पुन्हा विचाराचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:28 IST

बंदरामुळे प्रभावित गावानजीक जनसुनावणी ठेवण्याऐवजी ही जनसुनावणी वाढवण बंदर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल हा मूळ इंग्रजीत देण्याऐवजी स्थानिक मराठी भाषेत देणे बंधनकारक असताना गुगल रेकॉर्डिंगचा आधार घेत चुकीच्या पद्धतीने बनवून वाटप करण्यात आला.

- हितेन नाईक

पालघर : वाढवणपासून दूर ३० किमी अंतरावर ठेवलेली जनसुनावणी, स्थानिक भाषेत पुरविण्यात आलेला अहवाल व अनुषंगिक कागदपत्रे मराठीत योग्यरीत्या भाषांतर केली नसल्याचे कारण देत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दाखल केलेली याचिका उशिरा दाखल झाल्याने या याचिकेवर जनसुनावणी स्थगित करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे जनसुनावणी होणार असली मराठीतील अहवाल व अन्य बाबींवर पुन्हा विचार करण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.

बंदरामुळे प्रभावित गावानजीक जनसुनावणी ठेवण्याऐवजी ही जनसुनावणी वाढवण बंदर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल हा मूळ इंग्रजीत देण्याऐवजी स्थानिक मराठी भाषेत देणे बंधनकारक असताना गुगल रेकॉर्डिंगचा आधार घेत चुकीच्या पद्धतीने बनवून वाटप करण्यात आला. यामुळे शुक्रवारची जनसुनावणी रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका उशिराने आल्याचे कारण देत सुनावणी रद्द करता येणार नाही, असा निर्णय दिला. त्यामुळे वाढवण बंदरविरोधातील स्थानिकांच्या लढ्याबाबत एकत्र येऊन लढण्याच्या उणिवा यातून अधोरेखित झाल्या आहेत. यातून बोध घेत मच्छीमार संघटनांसह स्थानिकांना पुढची लढाई आता एकजुटीने लढण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाढवण बंदर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल इंग्रजी भाषेत न देता तो मराठी भाषेतून देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर त्यांच्या आदेशाने २२ डिसेंबर रोजी होणारी जनसुनावणी उद्या १९ जानेवारी रोजी पालघरच्या क्रीडा संकुलाच्या मैदानात होत आहे. या अहवालात अनेक तांत्रिक चुका असल्याची बाब वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान, पालघर पोलिस अधीक्षक अंतर्गत १६ पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील पोलिस कुमक मागविली आहे. वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयातील बॅरिकेड्स, वज्र, वरुण यासारख्या गाड्याही मागविण्यात आल्या आहेत. 

मागणी मान्य न केल्यास पुन्हा दाखल होणार याचिका    अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, लोकप्रहार सेना, युवा संघर्ष समिती आणि समुद्र बचाव मंच या संघटनांनी उच्च न्यायालयात जनसुनावणी रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली होती.    या याचिकेसंदर्भात गुरुवारी दोन्ही बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर जनसुनावणीसाठी जेएनपीएने कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याने आणि याचिका उशिराने दाखल केल्याचे कारण देत शुक्रवारची जनसुनावणी रद्द करण्याबाबत न्यायालयाने असमर्थता दाखवली.    जनसुनावणीमध्ये याबाबत आक्षेप नोंदविल्यानंतर त्या आधारे एमपीसीबीकडे पुन्हा अर्ज करून नव्याने जनसुनावणी घेण्याबाबत मागणी करावी. त्यांनी मागणी मान्य न केल्यास पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करता येऊ शकेल, असे मत न्यायालयाने नोंदविल्याची माहिती याचिकाकर्ते आणि कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी ‘लोकमत’ला दिली. 

४० गावे बाधितज्या ठिकाणी बंदर होणार आहे, त्याच परिसरात जनसुनावणी घेणे कायद्याला धरून असल्याचे मान्य करून या बंदरामुळे प्रभावित होणाऱ्या ४० गावांतील लोकांना जनसुनावणीच्या ठिकाणी नेण्यासाठी आणि आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :palgharपालघर