शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

उकाड्याने जनता हैराण...शीतपेयांसह आइसस्क्रीमलाही मागणी

By admin | Updated: March 30, 2017 05:14 IST

तालुक्यात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता खूपच वाढू लागली असून उष्णतेमुळे लाहीलाही होते आहे

हुसेन मेमन / जव्हारतालुक्यात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता खूपच वाढू लागली असून उष्णतेमुळे लाहीलाही होते आहे. अचानक आभ्रट तर कधी कडक उन या विषम हवामानामुळे, जीव हैराण करणारा उकाडा निर्माण झाला आहे. उन्हापासून व उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यसाठी सर्वजण लस्सी, आमरस, ताडगोळे, कलिंगड, आईस्क्रीम, बरफ गोल,े शीतपेय अशा थंड पदार्थाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. मार्च, एप्रिल व मे महिना म्हटलं की, कडक उन्हाळा सर्वांनाच जाणवतो. परंतु गेल्या काही वर्षापासून ऋ तूमानच बदलत असल्याने पावसाळा व हिवाळा कमी कमी होत चालला आहे. तर उन्हाळा वाढू लागला आहे. या वर्षी तर पालघर जिल्ह्यात काही तालुके भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. गेल्या महिन्याभरापासून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमान वाढले आहे. त्यामुळे जीव हैराण करणाऱ्या उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी लहानथोर मंडळी विविध प्रकाराचे उपाय करीत आहेत. शहरातील मंडळींना सावली अथवा फॅनचा आधार वाटतो तर ग्रामीण भागातील लोकांना झाडाच्या सावलीचा निवारा भुरळ घालतो. दुपारच्या कडक उन्हात हॉर्न वाजवत येणारा गारेगारवाला सर्वानाच आकर्षित करीत आहे. कडक उन्हात जिवाला थंडावा मिळण्यासाठी सध्या आईस्क्रिम विक्रेते व बर्फाचे गोळे विकणाऱ्या, गारेगारवाल्यांभोवती तसेच आमरस विक्रेत्यांकडे, लस्सी विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे.सौराष्ट्रचे प्रसिध्द राजकोट, उपलेटा येथील बर्फाचे गोळे, विक्रेत्यांकडे काडी वाले गोळे, डिश वाले गोळे, मिल्क मेडचे गोळे, ड्रायफ्रुट वाले गोळे, कच्ची कैरी, चॉकलेट, आॅरेज, स्ट्रॉबेरी आदि फ्लेवरमध्ये मिळतात. त्याच बरोबर लिंंबू सरबत व लस्सी ची चलती ही बाजारात जोरात आहे. शहरातील लोक दुपारी, सायंकाळच्या सुमारास गोळे व लस्सी, उसाचा रस, सरबत विक्रेत्यांकडे गर्दी करतांना दिसतात. डिश वाला साधा गोेळा रू. दहा तर ड्रायफु्रट वाला गोळा वीस व काडी वाला साधा गोळा रू. पाच प्रमाणे विकत आहे. तसेच लस्सी दहा हाफ तर बारा रूपये फूल ग्लास, तर मँगो ज्यूस दहा रूपये ग्लास, कलींगड दहा रूपये खाप, ताक बारा रूपये गलास, उस रस दहा रूपये ग्लास असा धंदा तेजीत आहे.आम्ही खेडोपाड्यातून कामानिमित्ताने तालुक्यालाचार-पाच किलोमिटर वरून पायी येत असतो नंतर बस किंवा खाजगी वाहनातून बाजार करण्यासाठी शहरात येतो, मात्र उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आम्हाला थंड पेयाचा आधार घेऊन गार व्हावे लागते. त्याविना दिवसभराची वणवण शक्यच होत नाही-रवी खुरकुटे, हेदीचापाडा