शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मनोरुग्णांना बसला कोरोनाचा फटका, गुजरात-मुंबईकडे घ्यावी लागते धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:47 IST

Vasai Virar News : कोरोनाकाळात अन्य आजारांच्या रुग्णांचे खूपच मोठ्या प्रमाणात हाल झाले, त्यात मनोरुग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसला.

- हितेन नाईकपालघर : कोरोनाकाळात अन्य आजारांच्या रुग्णांचे खूपच मोठ्या प्रमाणात हाल झाले, त्यात मनोरुग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसला. गेल्या काही महिन्यांत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाता न आल्याने त्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्हा निर्मितीला सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजूनही जिल्ह्यावासीयांना जिल्हा रुग्णालयाची उणीव भासत आहे. जिल्हा रुग्णालयासाठी आणि जवळच मेडिकल कॉलेजसाठी २५ एकर जमिनीची मागणी लालफितीत अडकून पडल्याने तुटपुंज्या आरोग्य व्यवस्थेचा मोठा फटका इथल्या गरीब रुग्णांना बसत आहे.पालघर जिल्ह्यात ३ जिल्हा उपकेंद्रे, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ४३६ उपकेंद्रांवर जिल्ह्याच्या आरोग्याचा भार उचलला जात आहे. मात्र जिल्ह्यातील अतिजोखमीच्या आजारावरील उपचारासाठी रुग्णांना एक तर मुंबई अथवा गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासा येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. शासनाने जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२० एकर जमीन सिडकोला दिली आहे. त्या बदल्यात काही शासकीय कार्यालये उभारण्याबरोबरच उरलेल्या शेकडो एकर जमिनीवर सिडको स्वतः काही प्रकल्प बांधून अब्जावधी रुपयांची माया गोळा करणार आहे. असे असताना जिल्ह्यातील गरीब रुग्णांवर विविध शस्त्रक्रियांसह महत्त्वपूर्ण आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य रुग्णालय उभारण्याची जनतेची मागणी आहे. जिल्हा रुग्णालयाजवळच मेडिकल कॉलेज उभारल्यास त्यात शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस यांची सेवा मिळविण्याच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण असताना आजही जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजसाठी २५ एकर जमिनीसाठी इथल्या लोकप्रतिनिधींना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. उपचारासाठी जावे लागते ठाणे येथेजिल्ह्यात मनोरुग्णांची संख्या मोठी आहे, मात्र जिल्ह्यात असे रुग्णालय नसल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात. तसेच इतर आजारांसाठीही गरीब रुग्णांना मुंबई येथील जे.जे., के.ई.एम., नायर आदी रुग्णालयांत जावे लागते. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय नसल्याने इथल्या गरीब रुग्णांना मुंबई, गुजरातशिवाय पर्यायच नसल्याने अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकप्रतिनिधींचे वजन पडतेय कमीहजारो एकर जमीन सिडकोला उदार हाताने वाटप करणाऱ्या सरकारला जिल्हावासीयांच्या आरोग्यासाठी २५ एकर जमीन मागणीनंतर त्यातील फक्त १० एकर जमीन देण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी लागत असल्याने शासन जिल्ह्यातील गरीब रुग्णांच्या आरोग्याविषयी किती संवेदनशील आहे हे दिसून येत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे वजन ही कमी पडत असल्याने त्यांनी जिल्ह्याच्या विकासात्मक बाबीसाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयासाठी १० एकर जमीन मंजूर झाली असून पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाल्यावर ताबडतोब भूमिपूजनाच्या कार्यक्रम आटपून कामाला सुरुवात केली जाणार आहे.- डॉ. अनिल थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयVasai Virarवसई विरार