शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीसाठी धरणांचे पाणी देणार; २३ पाटबंधारे प्रकल्पांचा करणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:11 IST

३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

- सुरेश लोखंडेठाणे : अतिवृष्टी, पूरस्थिती आणि आता अवकाळी पावसामुळे हाती आलेला शेतमाल वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाचा लाभ झाला नाही. शेतकऱ्यांनी हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदा रब्बी हंगामावर भर देण्यात येत आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील २३ पाटबंधारे प्रकल्पांतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकºयांनी या पाणीपुरवठ्याची मागणी तत्काळ नोंदवणे अपेक्षित आहे.ठाणे जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकºयांच्या ४२ हजार ४२६.३१ हेक्टरवरील भात, नागली व वरी आदी प्रमुख पिके हाती आली असता, अवकाळी पावसाने ती नष्ट केली. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील ५० हजार शेतकºयांचे शेकडो हेक्टरचे पीक अवकाळी पावसामुळे वाया गेले आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यांत अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यात पीक वाहून गेले. जे काय थोडेफार राहिले, त्यातील पीक आॅक्टोबर, नोव्हेंबरच्या अवेळी पावसामुळे खराब झाले. यंदाच्या खरीप हंगामाचा लाभ शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यावर मात करून रब्बी हंगाम घेण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. ठाणे जिल्ह्यात १६ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकºयांनी तयारी केली आहे.ठाणे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी एक हजार १०० क्ंिवटल हरभरा, भाजीपाला ७५० एकर आणि मका १३ हजार किलो आणि भुईमूग आदींच्या बियाण्यांचे वाटप केले जात आहे. जमिनीतील ओलावा आणि पडणाºया थंडीचा फायदा या रब्बी हंगामास होणार आहे. यामुळे अवकाळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भर या रब्बी उत्पादनांद्वारे काढता येणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनास अनुसरून पाटबंधारे विभागानेदेखील त्यांच्या नियंत्रणातील पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी शेतकºयांनी तत्काळ त्यांच्या शेतीस लागणाºया पाणीपुरवठ्याची मागणी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील २३ पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणी सोडण्यात येत आहे.ज्वारी, बाजरी, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला घेण्याची अपेक्षाआतापासून ३१ मार्चपर्यंत रब्बी हंगामासाठी बंधाºयांसह धरणांतून पाणी सोडले जाणार आहे. या पाणीपुरवठ्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी पाणी मागणीचा अर्ज तत्काळ भरण्याची अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील खराडे, आदिवली, वेल्होळी, डोळखांब, मुसई, जांभे प्रकल्पांतून पाणी सोडण्यात येणार आहे. मुरबाड तालुक्यामधील खांडपे, शिरोशी येथील केटीबी, जांभुर्डे, मानिवली, ठाकूरवाडी आदी धरणांतून पुरवठा होणार आहे.शेतीसाठी होणारा हा पाणीपुरवठा उपसापद्धतीसह पाणी प्रवाही असलेल्या बंधाºयाच्या प्रकल्पातून सोडण्यात येत आहे. भिवंडीमधील उसगाव, अंबरनाथचे जांभिवली, कल्याणच्या टिटवाळा येथील केटीबी बंधारा, उल्हास नदी आणि उपसा सिंचन आदी धरणे व बंधाºयातून शेतीला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याच्या खोच धरणातून, वाडा तालुक्याच्या डोंगस्ते, सिंधीपाडा, पाली केटीबी, जव्हारमधील वाडा केटीबी बंधारा आणि वसईमधील हत्तीपाडा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे यंदा निश्चित केले आहे. शेतकºयांनी शेतीची तयारी करून पाणीपुरवठा सुरू होण्याआधी दुरुस्ती करण्याची गरज आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब कारणी लागेल, यादृष्टीने शेतीसाठी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय होणार नसल्याची खात्री करणे अपेक्षित आहे. याशिवाय, १२० दिवसांत येणाºया भातपिकासह ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, भुईमूग, कडधान्य, तेलबिया आणि भाजीपाला घेण्याची अपेक्षा आहे.