शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पालघरमध्ये ‘हाथरस’च्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:09 IST

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.

पालघर/जव्हार : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असून या घटनेचा देशभर संताप व्यक्त होऊ लागला आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. जव्हारमध्ये हाथरस प्रकरणातील पीडितेला न्याय तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने जव्हार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेतील पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्कीच्या निषेधार्थ जव्हार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष फारूक मुल्ला, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संदीप मुकणे, जिल्हा सरचिटणीस भरत बेंद्रे, जिल्हा चिटणीस मोहसीन लुलानीय यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांचा प्रतीकात्मक पुतळा ही जाळण्यात आला. काँग्रेस कार्यकत्यांनी मोदी व योगी सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस प्रदीप राका, प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्ठे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रुफी भुरे, मधुकर चौधरी, जिल्हा कार्याध्यक्षा शरयूताई औसरकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश मुकणे, बळवंत गावित आदी उपस्थित होते.शेतकरीविरोधी विधेयकाचाही निषेधच्केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकार यांच्या मनमानी, तानाशाही व दंडेलशाहीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलने छेडण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जव्हार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.च्केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयक पारित केल्यामुळे भाजप सरकारविरोधात जव्हार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक येथे शुक्रवारी आंदोलन करून जव्हार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.तलासरी : उत्तर प्रदेशमध्ये १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. याचा निषेध म्हणून तलासरी नाका येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.निदर्शकांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करून बलात्कारी नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.तलासरी पंचायत समिती सभापती नंदकुमार हाडळ, उपसभापती राजेश खरपडे, नगरसेवक सुहास सुरती, सुरेश भोये, जिल्हा परिषद सदस्य अनिल झरिवा, अक्षय दवणेकर, पं.स. सदस्य शरद उंबरसाडा, गणपत वनगा, नरेश शिंगाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार