शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नदी जोडो विरोधात धडक मोर्चा, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:06 IST

जव्हार येथील वावर वांगणी येथे होत असलेल्या नदी जोडो प्रकल्पाच्या हालचाली विरोधात सोमवारी मार्क्सवाद्यांनी आपला आवाज बुलंद केला असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जव्हार : येथील वावर वांगणी येथे होत असलेल्या नदी जोडो प्रकल्पाच्या हालचाली विरोधात सोमवारी मार्क्सवाद्यांनी आपला आवाज बुलंद केला असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. स्थानिक शेतकºयांचे हित पायदळी तुडवत केंद्राने ही योजना जोर जबरीने आमलात आणल्यास आंदोलन अधिक तिव्र करु असा इशारा यावेळी देण्यात आला.गुजरात राज्य आणि दादरा, नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे वाघ व लेंदी या दोन नद्यांवर वावर वांगणी येथील भूगद डोहवर आणि कारगिल हिल टेकडी येथे केंद्राच्या योजनेनुसार दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम चालू होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमेटी सदस्य रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पबाधित शेतकरी एकत्र आले होते.या प्रकल्पामुळे ५२ गावे, आणि १ लाखाच्या आसपास आदिवासी कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गोरवाडी नाक्यावरुन या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा गोरवाडी नाका, यशवंतनगर, मोर्चा, पाचबत्ती नाका, गांधीचौक, मांगेलवाडा आणि जव्हारचे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने गेला. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तालुक्यातील शेतकºयांनी माकपाच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्च्याच्या शिष्टमंडळाची जव्हार अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळासमोर बोलावून लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी बुधर यांच्यासह प.स. सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव, तसेच जिल्हा शेक्रेटरी कॉ बारक्या मांगात, तालुका शेक्रेटरी कॉ यशवंत बुधर, कॉ शिवराम बुधर, कॉ विजय शिंदे, कॉ शांतीबाई खुरकुटे, आदी मान्यवरांच्या नेतृवाखाली मोच्यार्चे आयोजन करण्यात आले.अशा आहेत मागण्यामोर्च्यादरम्यान अन्य मागण्याही करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंजूर झालेल्या वनपट्टेधारकांना ७/१२ उतारा मिळाला पाहिजे, शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा, पेशा कायद्यानुसार नोकर भर्ती करावी, तालुक्यातील गाव-पाड्यांचे रखडलेले रस्ते पूर्ण करावे, तसेच जव्हार नगरपरिषद हद्दीतील आदिवासी कुटुंबांना घरकुल, शौचलयाचा लाभ देण्यात यावा, आश्रम शाळा आणि जि.प. शाळांचे खाजगीकरण करू नये. अशा मागण्या मोर्च्यादरम्यान करण्यात आल्या.