शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागात ‘खाजगी भरती’, १६ वर्षांपासून नियुक्तीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:58 IST

राज्य उत्पादक शु्ल्क विभागात गेल्या १६ वर्षांपासून नवीन कर्मचाऱ्यांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीनही कार्यालयातील बहुतेक कामकाज खाजगी व्यक्तींकडून चालवले जात आहे.

वसई : राज्य उत्पादक शु्ल्क विभागात गेल्या १६ वर्षांपासून नवीन कर्मचाऱ्यांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीनही कार्यालयातील बहुतेक कामकाज खाजगी व्यक्तींकडून चालवले जात आहे.पालघर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर, वसई आणि नालासोपारा अशा तीन ठिकाणी विभाग आहेत. जिल्ह्यात एक हजारांहून अधिक मद्यविक्रीचे परवाने आहेत. त्यांची तपासणी करणे, परवाने देणे, विविध मंजुºया देणे, बेकायदा दारू रोखणे, हातभट्टीच्या दारूवर कारवाई करणे आदी विविध कामे या विभागाला करावी लागतात. मात्र, या विभागाला कर्मचाºयांची मोठी कमतरता भेडसावत असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर, वसई आणि नालासोपारा उपविभागीय कार्यालयामध्ये प्रत्येकी एक निरिक्षक, दोन उपनिरिक्षक, तीन हवालदार, एक सहाय्यक उपनिरिक्षक आणि एक वाहन चालक असा कर्मचारी वर्ग आहे. सोळा वर्षांपूर्वी म्हणजे २००३ मध्ये या पदांची शेवटची भरती झाली होती. उत्पादन शुल्क विभागातील सर्व भ्रष्टाचारात याच व्यक्ती गुंतलेल्या असतात. (पान /३)‘झीरो नंबर’ म्हणजे काय प्रकार आहे ?सरकारी कार्यालयात काही अधिकारी कामे करण्यासाठी खासगी व्यक्तींना निवडतात. राज्य उत्पादन शुल्क विभागात असे काम करणाºया खासगी व्यक्तींना ‘झिरो नंबर’ म्हणून ओळखले जाते. अधिकाºयांसमवेत शासकीय कामे करणे, कारवाईत भाग घेणे अशा प्रकारची कामे ते करतात. त्यामुळे अनेकांना हे झिरो नंबर कर्मचारी शासकीय कर्मचारीच असल्याचे वाटते. पालघरमध्ये बाळा सुर्वे, प्रमोद पाटील, किरण दानवे तर वसईत भूपेश सावंत या व्यक्ती ‘झिरो नंबर’ म्हणून काम करतात.सरकारी कार्यालयात कुठल्याही प्रकारची खासगी व्यक्ती नेमता येत नाही. शासकीय कामात मदतही घेता येत नाही. अशी जर खाजगी माणसे असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.- अश्विनी जोशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्कराज्य उत्पादन शुल्क विभागात पदांची भरती न झाल्याने कर्मचाºयांचा तुटवडा आहे. त्यासाठी सरकारी कर्मचारी नसलेल्या खाजगी व्यक्तींकडून ही कामे करवून घेतली जात आहेत. हे चूकीचे आहे.- चरण भट , सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :jobनोकरीVasai Virarवसई विरार