शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

सातपाटी मच्छिमार संस्थेचा गौरव

By admin | Updated: April 30, 2017 03:49 IST

सोलापूर येथे राज्यशासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे देण्यात येणारा ‘सहकार भूषण’ पुरस्कार सातपाटीच्या मच्छीमार सहकारी संस्थेला राज्यपाल विद्यासागर

पालघर : सोलापूर येथे राज्यशासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे देण्यात येणारा ‘सहकार भूषण’ पुरस्कार सातपाटीच्या मच्छीमार सहकारी संस्थेला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचा स्वीकार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतीपर्वातील धेय्यवादी कार्यकर्त्यांनी स्थापना केलेली आणि सहकार तत्वाच्या भक्कम आधाराने पथदर्शक व नेत्रदीपक कामगिरी बजावून हिरकमहोत्सवाकडे वाटचाल करणारी महाराष्ट्राच्या सागरी मासेमारी क्षेत्रातील ही संस्था सन १९४४ साली स्थापन झाली. संस्थेचे आद्यप्रर्वतक क्रांतीकारी स्वातंत्रसैनिक कै. नारायण दांडेकर हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असतांना गरीब मच्छीमारांची मासळींच्या दलालांकडून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी प्रथम सात बोटींच्या गटाची मासळी स्वत: व्यापाऱ्यांच्या भावाने खरेदी व विक्र ी करून त्यात मोठा फायदा आहे हे मच्छीमाराना प्रत्यक्ष पटवून दिले व त्यांच्यात विश्वास निर्माण केला.संस्थेच्यावतीने मासेमारी जहाज बांधणी प्रकल्प मत्स्यव्यवसाय खात्याच्या सहकार्याने हाती घेतला असून १९४७ साला पासून आजही तो सुरु आहे. त्याच दरम्यान संस्थेच्या सभासदाच्या बोटीला इंजिन बसवून त्यांच्या यांत्रिकीकरणांचा पायाही घातला. संस्थेच्या सभासदांना व्यवसायासाठी जिल्हा बँकेकडून २ कोटीपर्यंत कर्ज मिळवून देऊन त्या कर्जाची मुदतपूर्व १०० टक्के परतफेड करणारी एकमेव संस्था असून ‘अ’ आॅडिट वर्ग सतत मिळवीत आली आहे. ग्रुप बोटधारकांना शासनाच्यावतीने यांत्रिकीकरण, आधुनिक उपकरणे, बोटीत अत्याधुनिक शीतपेट्या बसविणे, आपद्ग्रस्त बोटधारकाना 2 लाखापर्यंत आर्थिक मदत देणे, अल्पदरात बर्फ, डिझेल, मच्छिमार साहित्य देण्याबरोबरच मच्छिला रास्त भाव मिळवून देणे ही कार्ये संस्था करीत आहे. त्याबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला आहे. पालघरची शान वाढलीयावेळी विधानसभा अध्यक्ष रीभाऊ बागडे , सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख तसेच अनेक खासदार , आमदार उपस्थित होते. या पुरस्कारामुळे पालघर जिल्ह्याच्यी व मच्छीमार समाजाची शान संपूर्ण देशात उंचावली आहे.