शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

आदिवासींच्या बांबू हस्तकलेचे राष्ट्रपतींना कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:36 IST

महिला कलाकारांची केली प्रशंसा; दुर्गम भागात उपलब्ध होतो रोजगार

विरार : बांबूपासून शोभेसह गृहोपयोगी वस्तू बनवत संस्थेच्या माध्यमातून त्या विकून आपल्या पतीसह संसाराचा गाडा हाकणाऱ्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी तसेच गरजू महिलांच्या हस्तकलेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भुरळ पाडली. या हस्तकलेचे राष्ट्रपती तसेच राज्यपालांनी कौतुक केले असून या महिलांना दुर्गम भागात रोजगार उपलब्ध करून देणाºया ‘विवेक’ या संस्थेच्या कार्याचीही प्रशंसा केली आहे.पालघर जिल्ह्यातील आदिवासी तसेच गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर अनेक वर्षांपासून काम करत आहे. या महिलांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने त्यांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर महिला आता २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करतात. त्यात ट्रे, आकाश कंदील, मोबाइल होल्डर, राख्या, फ्रुट बास्केट, पेपरवेट, टी कोस्टर यांसारख्या आकर्षक वस्तूंचा समावेश आहे. सदर उत्पादने ही उच्च प्रतीची आणि दर्जेदार असल्याने त्यांना मागणीही भरपूर असते.जिल्ह्यातील महिलांनी बनवलेल्या या बांबूच्या पर्यावरणपूरक आकर्षक वस्तू विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पुणे येथील राजभवनात भेटी दाखल दिल्या होत्या. यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक प्रदीप गुप्ता, व्यवस्थापक लुकेश बंड, प्रशिक्षण आणि विकास अधिकारी प्रगती भोईर तसेच वनवासी भगिनी निर्मला दांडेकर, वैशाली दांडेकर, प्रतीक्षा गोवारी व सुरेखा जाधव या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यासमोर उपस्थित होत्या.राष्ट्रपती कोविंद यांनी या बांबू हस्तकलेचे कौशल्य पाहून वनवासी भगिनींचे मोठे कौतुक केले. तसेच त्यांना हस्तकलेमार्फत रोजगार मिळवून दिल्याबद्धल विवेक सेंटरच्या कायार्ची प्रशंसा केली. त्याचबरोबर पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या वनवासी भगिनींच्या मार्फत तयार करणाºया वस्तूंचा अधिकाधिक उपयोग करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद