शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये ७५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:30 IST

महावितरणाकडून युद्धपातळीवर काम; ५७ वाहिन्यांमध्ये झाला होता तांत्रिक बिघाड

पालघर : मुसळधार पावसामुळे रविवारी पालघरमध्ये एकूण ५७ वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अंदाजे ७५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडे वाहिन्यांवर उन्मळून १४ खांब, उच्चदाबाचे सहा खांब आणि ५ रोहित्रांचे नुकसान झाले.वीजपुरवठा खंडित झालेल्या ५७ वाहिन्यांपैकी ३५ वाहिन्यांचा पुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित २२ वाहिन्यांवरील अंदाजे २७ हजार ग्राहकांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाऊस आणि वाºयामुळे कामात अडचणी येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष घालत असून ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील करवळ ग्रामपंचायत अंतर्गत गावातील ४० ते ५० ग्रामस्थ खरेदीसाठी गेलेले अडकून पडले होते. या दुर्गम भागात आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत पोहचणे कठीण असल्याने दोरखंडाच्या मदतीने सुखरूप सुटका करून घेतली. पुलाला जोडणारा रस्ता वाहून पुराच्या पाण्यात वाहून गेला. अतिशय दुर्गम भाग असल्याने अशा संकटावर एकत्रित जमून मात करत असल्याचे एकनाथ झुगटे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.वसई तालुक्यातील उपकेंद्रात पाणी शिरल्याने रविवारी सकाळी साडेसहा वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे दीड लाख ग्राहक बाधित झाले होते. त्यामुळे नवघर औद्योगिक वसाहत, सातीवली-अग्रवाल औद्योगिक वसाहत,सनसिटी परिसर बाधित झाला होता. मोखाडा उपकेंद्रातून जाणारी खोडाळा वाहिनी बंद पडल्याने खोडाळा, सडकवाडी, डोल्हारा आदी भागतील ५ हजार १०० ग्राहक बाधित झाले होते. तसेच केळवे रोड, दापचरी, डहाणू आदी भागात सतत पुरवठा खंडित होत होता. रविवारी सकाळपर्यंत सरासरी १९०.०८ मिमी पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत एकूण २ हजार २५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.वसई तालुक्यात २१४.३३ मिमी, वाडा २५२.८१, डहाणू ७०.७०, पालघर २२२.३३, जव्हार २३१.७५, मोखाडा- २५८.५०, तलासरी ८५.६३ आणि विक्रमगड १८७.८८ मिमी. इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धामणी धरणाची आजची पाणीपातळी ११७ मी. असून पाणीसाठा २५५.२२१ दशलघमी म्हणजेच 92.35% इतकी आहे. कवडास उन्नैयी बंधाºयाची पाणी पातळी ६६.९० मीटर. तर पाणीसाठा ९.९६ दशलक्षघमी असून हा बंधारा १०० टक्के भरला आहे. वांद्री मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी ४४.८२ मी असून पाणीसाठा ३५.९३ दलघमी इतका आहे. हे धरण देखील 100% भरले आहे. कुर्झे धरणाची पातळी ६८.८० मी. तर पाणीसाठा ३१.१५ दलघमी म्हणजेच ७९.७७ टक्के इतका आहे.वसईकिनारी ६ मीटर उंचीच्या लाटावसई : वसईच्या विविध किनारपट्टीवर शनिवारी, रविवारी जवळपास ५.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा पूर्वीच देण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले.शनिवारी रात्री सोसाट्याचा वारा आणि त्यात मुसळधार पावसामुळे वसईतील किल्ला बंदर, पाचू बंदर, रानगाव , अर्नाळा किनारपट्टीजवळच्या घरांचे भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.वसई-विरारमध्ये शुक्र वारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये वसईतील विविध किनाºयावर खास करून अर्नाळा येथील गणपती रोड किनाºयावरील काही घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे.पाचू बंदर व किल्ला रोड येथील घरांना भेगा पडल्या, तर काहींच्या भिंती कोसळल्या आहेत. खाडीचा पाड्यात राहणाºया आदिवासींची ३५ ते ४० घरे पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणी साधारणपणे १५० लोकांची वस्ती असून शुक्र वार व शनिवारची संपूर्ण रात्र त्यांनी उंचवट्यावर बसून काढली. रविवारी दुपारी त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था तहसीलदारांतर्फे अर्नाळा जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली.वसईतील नवघर माणिकपूर शहरात तर बहुतेक सोसायटीत व दुकानात पाणी साचले आहे. तर नवघर डेपो, १०० फूट रोड व वसईतील सनसिटी रस्ता ,मिठागरे वसाहत आणि पूर्वेस महामार्ग, शिरसाड तसेच तानसा नदीवरील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे.चौघांना सुखरूप बाहेर काढलेमनोर : मनोरजवळील करळगाव येथे तलाव राखणारे चार जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना रविवारी सायंकळी येथील ग्रामस्थांनी आपला जीव मुठीत घेऊन सुखरूप बाहेर काढले. नांदगाव येथील नंदनवनमध्ये अडकलेल्या कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलवले.करळगाव येथे असलेल्या तलावातील मासे राखण्या साठी शैलेश सरोज, संतोष सरोज, मोहरम अली वय व दिलीप सरोज असे एकूण चार जण होते. शनिवारी रात्री अचानक पाणी त्यांच्या घराच्या चारही बाजूने शिरल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.रविवारी संध्याकाळी ग्रामस्थांनी टायर टूपचा वापर करून सुखरूप बाहेर काढले. नांदगाव नंदनवन येथे बाबू भाई यांच्या कुटुंबियांना सुखरूप एका इमारतीच्या गच्चीवर हलवण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी गजरे, तहसीलदार महेश सागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.

टॅग्स :Rainपाऊस