शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

आशेरी गडावर तळीरामांना दुर्गमित्रांनी चांगलेच चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 00:16 IST

कासा जवळील आशेरी गडावर मंगळवारी मद्यपान, दारूपार्टी करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रंगेहाथ पकडून दुर्ग मित्रांनी चांगलेच चोपले व गडावरून हुसकावून लावले.

कासा : कासा जवळील आशेरी गडावर मंगळवारी मद्यपान, दारूपार्टी करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रंगेहाथ पकडून दुर्ग मित्रांनी चांगलेच चोपले व गडावरून हुसकावून लावले. दरम्यान दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटनाचे पेव फुटते. हौशी पर्यटक तर मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात, त्यात जंगलातील गडकिल्ल्यांवर गर्दी होते. मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मेंढवण गावाजवळचा शिवाजी महाराजांच्या काळातील आशेरी गड येथे चढण्यासाठी कठीण असला तरी अनेक पर्यटक तिथे जातात. मात्र आशेरी गडावर मंगळवारी आठ दहा पर्यटक, मद्यपान करून हुल्लडबाजी करत होते. काही वेळाने स्थानिक पर्यावरण प्रेमी तेथे आलेत. त्यांनी या हुल्लडबाज दारुबाज पर्यटकांना दम देऊन परतण्यास सांगितले. मात्र त्यांनी वाद घालण्यास सुरु करताचकाहींना चांगलाच चोप दिल्याने ते तात्काळ पसार झालेत.दरवर्षी परिसरातील दुर्गाप्रेमी एकत्र येऊन आशेरी किल्ल्याची साफसफाई करतात. मागील वर्षी या गडावरील तीन टाक्या व दोन तलाव दुर्गमित्रांनी साफ केले होते. मात्र अशा प्रकाराने गडाचे पवित्र नष्ट होत आहे. पर्यावरण खाते व वनविभागाने गडावर सूचना फलक लावणे आवश्यक आहे. तसेच असे मद्यपान करणाºया पर्यटकांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक पर्यावरण प्रेमी करत आहेत. परंतु त्याकडे ना पुरातत्व खाते लक्ष देते ना पोलिस आणि जिल्हा प्रशासन लक्ष देते अशी अवस्था आहे.>गडावर अशा प्रकारच्या मद्य पार्ट्या करणे चुकीचे आहे. त्यामुळे इतिहासकालीन गडांचे पवित्र नष्ट होते. त्यामुळे अशा पर्यटकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.- संतोष वझे, दुर्गप्रेमी