शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

सोशल मीडियाच्या काळात पोस्टाचे ‘वैभव हरपले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:42 PM

अवस्था अतिशय बिकट, उतरती कळा

नालासोपारा : सरकारी योजना पोस्ट आॅफिसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र पण वाढवण्यात आले आहे. काही योजना लोकांपर्यन्त पोहचवण्याची जवाबदारी पोस्टावर आहे. या योजना लोकांपर्यन्त पोहचतील का ? याबाबत काहीही विचार करण्यात आलेला नाही. काही पोस्ट आॅफिसची अवस्था आणि दुर्लक्ष यामुळे बिकट झाली आहे तर दुसरीकडे सरकार काहिना काही योजना काढून त्याचा भार वाढवत आहे. काही याच प्रकारची स्थिती वसईच्या वालीव विभागात असलेल्या पोस्ट आॅफिसची झालेली आहे. अत्यंत बिकट अवस्था आणि समस्येने ग्रासलेले हे पोस्ट आॅफिस आहे.एखाद्या वीरान खंडहरा सारखी अवस्था या पोस्टाची झाली आहे. ५० वर्षे जुन्या ज्या इमारतीमध्ये हे पोस्ट चालवले जाते. तिची अवस्था अत्यंत धोकादायक असून ती कधीही कोसळू शकते. कर्मचारी जीव मुठीत धरूनच येथे कामे करतात. याविषयी त्यांनी अनेक वेळा तक्र ारी केल्या आहेत पण त्याकडे सातत्याने काणाडोळा केला जातो आहे.या पोस्टामधे सुरक्षेचाही अभाव आहे. कागदपत्राची कोणतीही सुरक्षा याठिकाणी नाही. आलेले पत्र, पार्सल सामान यांचीही सुरक्षा नाही . पोस्ट आॅफिसचा मुख्य दरवाजा अतिशय कमजोर आणि खिडक्या असून नसल्यासारख्या आहेत. सरकारी योजनाचे कागदपत्र काही लोकांचे गहाळ्ही झाले असल्याचे कळते.पोस्टमन आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वसई पूर्वेकडील काही मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या साहयाने पोस्ट आॅफिसचा कारभार सांभाळत आहेत. पोस्टमनचा अभाव असल्या कारणाने कागदपत्रे आणि आलेली पत्रे संबंधितांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याचेही कळते. कार्यक्षेत्र या पोस्ट आॅफिसचे मोठे असले तरी एक दोन पोस्टमनच्या साहयाने बटवडा केला जातो.या पोस्टात सर्वसामान्यांच्या ठेवी, मुदतठेवी, मासिक उत्पन्नयोजना , पोस्टल विमा योजना आदींची करोडो रुपयांचे मूल्य असलेली कागदपत्रे ठेवलेली आहेत. त्यांच्याही सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याचीही शक्यता आहे.नव्या तंत्रज्ञानाचे प्रखर आव्हान कसे पेलणार? हाच खरा प्रश्नचार दशकांपूर्वी कुरिअर आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेले रेडिओ पेजर, सुरू झाले तेव्हा पोस्ट खाताने आपले डोळे उघडळे नाही. नव्या तंत्रज्ञानाची कास धरली नाही त्यामुळे पैसे पाठविणे, पत्रे पाठविणे या मुख्य व्यवसायाला लागत असलेला सुरूंग पोस्टाने कधी गांभिर्याने घेतला नाही. इंटरनेट आल्यावर तर इमेलमुळे पोस्टाची मृत्यूघंटाच वाजली. उरली सुरली कसर आरटीजीएस तंत्राने भरून काढली. पैसे पाठविण्याचे एकमेव माध्यम होत मनिआॅर्डर आणि इंन्शुअर्ड पार्सल परंतु आरटीजीएसमुळे काही क्षणात पैसे कुठून कुठेही पाठविणे शक्य झाले. एकेकाळी दुरध्वनी सेवा पोस्टाची मक्तेदारी होती. त्यालाही मोबाईल फोनमुळे सुरूंग लागला. त्यातून पोस्टाचे वैभव लयाला जात राहिले.इमेल, व्हॉट्स अ‍ॅप, मॅसेजिंग व तत्सम नव्या तंत्रामुळे , कुरिअर, पोस्टाचे महत्व दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यात आहे त्या कार्यालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस