शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोशल मीडियावरची मैत्री महागात, महिलेने मागितली तरुणाकडे खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 00:14 IST

अश्लील व्हिडीओ प्रकरण : महिलेने मागितली तरुणाकडे खंडणी

ठळक मुद्देनालासोपाऱ्याच्या तुळिंज रोडवरील साईधाम बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या गौरवसिंग राजपुरोहित (२४) याच्या मोबाइलवर ६ ते ८ मार्चदरम्यान पैशांची मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : पूर्व परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणासोबत सोशल मीडियाद्वारे मैत्री करून व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडीओ बनवून तो मित्रांना पाठवून देण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा बुधवारी दाखल झाला आहे. 

नालासोपाऱ्याच्या तुळिंज रोडवरील साईधाम बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या गौरवसिंग राजपुरोहित (२४) याच्या मोबाइलवर ६ ते ८ मार्चदरम्यान पैशांची मागणी करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील महिला आरोपी नेहा शर्मा हिने गौरवसोबत फेसबुकद्वारे मैत्री केली. नंतर त्याचा मोबाइल नंबर मिळवून व्हॉट्सॲपवर बोलून व्हिडिओ सेक्सची मागणी केली. आरोपी महिला ऐकत नसल्याने त्याने मान्य केले. तो अश्लील व्हिडीओ तयार करून आरोपीने त्याच्या मित्रांना पाठवून देईन, अशी धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. त्याने नकार दिल्यावर अश्लील व्हिडीओ आरोपीने त्याच्या मित्रांना पाठवून दिला. पीडित तरुणाने बुधवारी तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करून तो तपासासाठी सायबर सेलला पाठवणार असल्याचे तुळिंजचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ज्यांना ओळखत नाही, त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट तरुण पिढीने स्वीकारू नये, जेणेकरून फसवणूक होणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार