शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वनगांची लोकप्रियता सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:02 IST

भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांची या मतदारसंघात लोकप्रियता किती अफाट होती हे या पोटनिवडणुकीने सिद्ध केले आहे.

नंदकुमार टेणी पालघर : भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांची या मतदारसंघात लोकप्रियता किती अफाट होती हे या पोटनिवडणुकीने सिद्ध केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत कोणत्याही झगमगाटी प्रचाराविना लढविलेली ही निवडणूक वनगा यांनी ५३३२०१ इतक्या प्रचंड मताने व २३९५२० इतक्या मताधिक्याने जिंकली होती. हे ध्यानी घेता या पोट निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पडलेली २७२७८२ ही मते आणि त्यांना मिळालेले २९५७२ हे मताधिक्य एकदम खुजे वाटते. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचा उमेदवार नव्हता, तो आता होता. त्यामुळे भाजपाच्या गावितांना मिळालेली २७२७८२ व शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना पडलेली २४३२१० या दोन्ही मतांची बेरीज केली तरी ती ५१५९९२ इतकी होते. म्हणजे या मतांपेक्षाही वनगांनी २०१४ मध्ये मिळविलेली ५३३२०१ ही मते प्रचंड ठरतात. केवळ कामाच्या आणि लोकप्रीयतेच्या जोरावर ते विजयी झाले होते. हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.अशा परिस्थितीत अवघ्या सहाच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूका झाल्यात. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात किमान निम्म्यातरी मतदारसंघात भाजप विजयी होईल, अशी भाजपची अटकळ होती. परंतु तसे झाले नाही. जनतेने नालासोपारा, वसई, बोईसर इथे बविआचे क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, विलास तरे यांना विजयी केले तर पालघरमध्ये कृष्णा घोडा, डहाणूत पास्कल धनारे आणि विक्रमगडमध्ये विष्णू सवरा यांना विजयी केले. म्हणजे सहा पैकी चार मतदारसंघात जनतेने भाजपेतर पक्षांना विजयी केले होते.कृष्णा घोडा यांच्या विजयानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचे पुत्र अमित घोडा यांना सेनेने उमेदवारी दिली. जनतेने त्यांनाही विजयी केले. याचाच अर्थ लोकसभेत मोठा विजय मिळाला म्हणजे त्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघात विजय मिळेल असे गृहीत धरण्याची आवश्यकता नाही. असेही या निवडणुकीने स्पष्ट केले होते.