शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ व कोरोनाच्या निमित्ताने सर्वधर्म मैत्रीला पोप फ्रान्सिस यांची विश्व बंधुत्वाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 20:43 IST

आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो : वसई धर्मप्रांतात बिशप हाऊसच्या वतीनं सर्वधर्म मैत्री प्रार्थना मेळावा संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : जगावर आलेलं कोरोनाचे संकट ओढवलेलं असताना त्यात नाताळ निमित्ताने सर्वधर्म मैत्रीला रोम वरून पोप फ्रान्सिस यांनी विश्व बंधुत्वाची हाक दिली असल्याचं आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो यांनी सांगितले.

कोविड -19 या विषाणूचे जीवघेणे सावट अध्याप दूर झालेले नसून राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या कोविड -19 संदर्भात सर्व अटीं नियमांचे  काटेकोरपणे पालन करत वसई धर्मप्रांतामध्ये नाताळ सर्वधर्म मैत्री सण शुक्रवारी संध्याकाळी वसईच्या बिशप हाऊसच्या वतीनं गिरीज स्थित जीवन दर्शन केंद्रा मध्ये आर्च बिशप डॉ .फेलिक्स मच्याडो यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.

यावेळी बिशप यांच्या सोबत निवडक फादर्स काही स्वयंसेवकांच्या  मदतीने  मार्गदर्शक तत्वे व सूचना चे  काटेकोरपणे पालन करत लोकांना त्यांची ख्रिस्ती श्रद्धा पाळण्यासाठी व नाताळ सण साजरा करण्यास मदत, व दुस-या बाजूला त्यांचे कोविड – 19  विषाणूपासून पूर्ण संरक्षण अशी दुहेरी खबरदारी घेत हा मैत्री मेळावा भावगीत व प्रार्थना करत संपन्न झाला 

दरवर्षी प्रमाणे नाताळसणाचे औचित्य साधून, सर्व धर्म मैत्री प्रार्थना मेळावा बिशप हाऊस मध्ये साजरा होतो मात्र यावेळी कोविड मुळे अगदी निवडक अशा 25 व्यक्तींसह जीवन दर्शन केंद्र, गिरिज येथे  शुक्रवारी नाताळ संध्येला संपन्न झाला. 

सदर प्रार्थना मेळाव्यास वसईचे माजी आमदार  डॉमिनिक घोन्सालवीस,  विविध धर्माचे नेते, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीं आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो ह्यांच्या आमंत्रणाला मान देऊन  उपस्थित होते.

या कार्यक्रमात नाताळ गीतानंतर प्रार्थना, दीप प्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाची सुरवात झाली.

कोरोंना महामारी पासून संपूर्ण जगाचे संरक्षण व्हावे, जगात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करत उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आर्च बिशप डॉ  फेलिक्स मच्याडो ह्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत नाताळ निमित्ताने  पोप फ्रान्सिस यांचा ही  शुभ संदेश वसईकरांना दिला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :ChristmasनाताळVasai Virarवसई विरार