शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राजकीय समीकरणामुळे निवडणुकीत उमेदवारांना चिंता मतविभागणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:11 IST

डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २८ मे ला पोट निवडणुक होत आहे़ त्यामुळे या मतदार संघात सध्यस्थित बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे.

तलवाडा - डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २८ मे ला पोट निवडणुक होत आहे़ त्यामुळे या मतदार संघात सध्यस्थित बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस होता त्यामुळे आजपासुनच निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़अनुसुचित जमातीकरीता राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आप-आपल्या ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत़. त्यामुळे डहाणु लोकसभेतून नव्याने निर्माण झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मत विभागणी होण्याची चिन्हे दिसत आहेत़ यामध्ये प्रामुख्याने भाजपा-शिवसेना आमने सामने, बहुजन विकास आघाडी, कॉग्रेस-राष्टÑवादी, माकप अशी पंचरंगी लढत बघावयास मिळणार आहे. मात्र, खरी लढत भाजपा व बहुजन विकास आघाडी यांचेमध्ये अपेक्षित आहे़परंतु उमेदवारांनी मतदारांवर कितीही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला तरी मतांची विभागणी व स्थानिक राजकारण यावरच उमेदवारांचा टिकाव लागणार आहे़ त्यामुळे हा गड कोण काबीज करण्यात यशस्वी ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे़ परंतु, तत्पुर्वी सर्वच राजकीय पक्ष आपले श्रेष्ठत्व सिध्द करु लागले आहे़ हे आज शेवटच्या दिवशी भरण्यांत आलेल्या उमेदवारी अर्जां वरुन दिसुन आले़सेनेकडून श्रीनिवास वनगा, भाजपाकडून राजेंद्र गावित, कॉँॅगे्रसकडुन दामु शिंंगडा, बविआकडून बळीराम जाधव, तर माकपाकडून किरण गहला यांनी गुरुवारपासुनच आपला प्रचार सुरु केल्यान लोकसभा पोट निवणुकीत प्रत्येक मताला किंमत आली आहे़डहाणु लोकसभा मतदारसंघाचा काही भाग असा मिळून हा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्याने उमेदवार नव्या चेहऱ्याचा दिसणार अशी मतदारांना अपेक्षा होती परंतु जुनेच चेहरे समोर येत असल्याने मतदारांना हवे असलेले घडलेले नाही़ त्यामुळे पुर्वी लोक प्रतिनिधी म्हणुन मतदारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे़ त्यांच्या स्थानिक विकास कामाच्या जोरावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे़ मात्र या पंचरंगी लढतीत मत विभागणीची चिंता येथील उमेदवारांना भेडसावत आहे़ दरम्यान, सर्वच पक्षांनी प्रचारावर भर दिला आहे.शहरी भागामध्ये बविआची ताकदपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीने जयत तयारी केलेली आहे़ कार्यकर्त्यांच्या बैठका गुरुवारपासुनच सुरुच झाल्या आहेत़ यासुंपुर्ण लोकसभा मतदार संघात साडेसतरा लाख मतदार असुन बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या वसई, नालासोपारा व बोईसर या तिन विधानसभा मतदार क्षेत्रात दहा लाखाहुन अधिक मतदार आहेत़ ही बाब निवडणुकीत जमेची बाजु ठरल्यास त्यांना फायदा होऊ शकेल.कॉग्रेससाठी संघर्ष तरी लोकांना ताकदीचा पर्यायया संपुर्ण मतदार संघात कॉगे्रसची हवी तशी बांधणी नसल्याने कॉगे्रससाठी ही निवडणुक कठीण परीक्षा ठरणार आहे. मात्र, राष्टÑवादी कॉग्रेस ही निवडणुक स्वबळांवर जिंकू शकत नसल्याने त्यांनी पाठींंबा दर्षविला आहे. मात्र कॉगे्रसकडे कार्यकर्ता व मतदार बांधणीला हातामध्ये जास्त वेळ नसल्याने निवडणुकीच्या रिंगणात त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे़ दरम्यान, मोदी आणि भाजपाला ताकदीचा पर्याय ठरत असल्याने देश पातळीवरील राजकारणात कॉँग्रेस चर्चेमध्ये आहे.भाजपा आपली संपूर्ण ताकद एकवटणारवाढवन बंदर, सुपर हायवे, बुलेट ट्रेन या मुद्यांना सामोरे जाणाºया भाजपाकडे सध्या कोणतीही लाट नसली तरी जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये संघ परिवार व अंगीभूत संघटनांची बांधणी पक्की आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगाच्या पुत्राने सेना प्रवेश केल्याने सहानुभूतीची लाट नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आगामी काळात प्रचाराच्या निमित्ताने मोठ मोठे नेते, मंत्री रणधुमाळीत दिसणार आहेत.माकपाकडे टक्कर देण्याची ताकदमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद सध्या या लोकसभा मतदार संघात वाढु लागली आहे़ या भागातील महत्वाच्या समस्यांवर व प्रश्नांवर होत असलेल्या आंदोलनांसाठी (आरचासंहितेपुर्वी) मोठी गर्दी जमत होती. त्यामुळे या आदिवासी मतदार संघात आपला उमेदवार उभा करुन माकपा इतरांना टक्कर देण्याची ताकद ठेऊन आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक