शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

वादग्रस्त फलक हटविण्याचा पोलिसांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:36 IST

चिखले ग्रामपंचायतील प्रकार; संविधांनाच्या काही कलामांची चुकीची माहिती

बोर्डी : झारखंड मधील पत्थलगढी चळवळीशी साम्य असलेले फलक डहाणू तालुक्यातील चिखले गावात लावण्यात आले आहेत. भारतीय संविधानातील कलमांचा आधार देत त्यात काही मजकूर चुकीचा लिहला आहे. या वादग्रस्त लिखाणामुळे समाजात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकत असल्यामुळे हे फलक काढण्याचा आदेश घोलवड पोलिसांनी दिला आहे. तर ग्रामसभेचे आयोजन करून हे चुकीचे फलक बदलले जातील असे स्पष्टीकरण ग्रामपंचायतीने लोकमतशी बोलतांना दिले.या फलकावर भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुछेदात या गावचे क्षेत्र येत असल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये अनुछेद १३ (३) (क) नुसार या क्षेत्रातील रूढी परंपरा, प्रथांना कायद्याची ताकद लागू आहे. अनुछेद २४४ (१) (ख) नुसार अनुसूचीत क्षेत्रात भारतीय संसद वा राज्यसरकारच्या विधानसभेत तयार झालेले कोणतेही सामान्य कायदे लागू नाहीत. अनुछेद (१९) (५) अनुसूचीत क्षेत्रात आदिवासींव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना स्वतंत्रपणे फिरणे, निवास करणे, कायम स्थानिक होण्यास सक्त मनाई आहे. अनुछेद (१९) (६) नुसार आदिवासी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तीस व्यापार, व्यवसाय, धंदा, नोकरी करण्यास मनाई आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार लोकसभा ना विधानसभा, सबसे उंची ग्रामसभा, सर्वोच्च न्यायालयाच्या पी. रामारेड्डी विरुद्ध १९८८ नुसार या क्षेत्रात सरकार एका व्यक्ति प्रमाणे आहे, समता जजमेंट १९७७ नुसार येथे केंद्र किंवा राज्य शासनाची एक इंच सुद्धा जमीन नाही. सर्वोच्च न्यायालय निकाल महाराष्ट्र (५/१/२०११) नुसार आदिवासी हाच या देशाचा मूळ मालक आहे. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. त्यावेळी ठराव घेऊन फलक काढण्यात येतील.-अनिता कवटे, सरपंच, चिखले ग्रामपंचायतया फलकावरील संविधानाचा संदर्भ देऊन लिहिलेला काही मजकूर लक्षात आल्यावर, ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे.- संभाजी यादव, प्रभारी अधिकारी,घोलवड पोलीस ठाणे

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत