वसई : पोलीस असलेल्या पतीने आपल्याच पत्नीवर जबरदस्तीने घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. पत्नीच्या तक्रारीवरून बलात्कारी पती विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती हा रेल्वे पोलीस दलात सहायक निरीक्षक पदावर तर पत्नी ही कॉन्स्टेबल आहे. मागील दीड वर्षांपासून या पती-पत्नीचा वाद कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे मंगळवारी पतीने पत्नीच्या घरी येऊन तिच्यावर जबरदस्ती केल्याने त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अद्याप आरोपी पतीला अटक झाली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नालासोपाऱ्यात पोलिसाचा पत्नीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:49 IST