शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:12 IST

आरोपी ड्रायव्हर : १४ लाख रुपयांच्या रोख रकमेसह यूपीतून अटक

नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा येथील मोकळ्या जागेवर रघुराम श्रीनिवास ऐथल (७२) यांची हत्या केलेला मृतदेह १३ मे रोजी वालीव पोलिसांना सापडला होता. त्यांची हत्या त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या कार चालक राहुल यादव याने गळा दाबून केली होती व १५ लाख रु पये घेऊन पळून गेला होता. वालीव पोलिसांच्या टीमने आरोपी कार चालक राहुल रामणारायन यादव (२५) याला यूपीतून अटक करून १४ लाख रु पये जप्त केले आहे. पोलिसांनी राहुलला वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वयोवृद्ध रघुराम श्रीनिवास ऐथल हे मुंबईच्या मस्जिद बंदर येथील कंपनीमध्ये कामाला असून कंपनीच्या मालकांच्या रुपयांचे देवाणघेवाणाचे काम करत होते. याच कंपनीमध्ये राहुल यादव नावाचा कार चालक काम करत होता. १३ मे रोजी सकाळी मालकांनी रघुराम यांना १५ लाख रुपयांची रोख रक्कम दिली आणि बोरिवली येथील एका पार्टीला देण्यासाठी सांगितले होते. रघुराम यांनी कार चालक यादव याला आपल्यासोबत चालण्यास सांगितले. पण यादव याची नियत बिघडली आणि कंपनीच्या आजूबाजूलाच रघुराम यांचा गळा आवळून हत्या केली होती.

हत्या केलेला मृतदेह गाडीत ठेवून कार मालजीपाडा येथील मोकळ्या जागेवर ठेवून १५ लाख रुपये घेऊन यादव पसार झाला होता. याच गुन्ह्याचा तपास करणारे तपास अधिकारी व सहायक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या टीमने कार मालकाची आणि कार चालकाची माहिती तपासात मिळवली. कार मालकाने पोलिसांना सांगितले की, ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवसांपासून मॅनेजर गायब होता आणि तो त्याच दिवसांपासून सुट्टी घेऊन गावाला गेला आहे. या माहितीच्या आधारे वालीव पोलिसांनी यूपीच्या कॉन्सर गावातून आरोपी कार चालक राहुल रामणारायन यादव (२५) याला अटक करत घरात झाडाझडती केली असता लोखंडाच्या बॉक्समधून १४ लाख रुपये पोलिसांना सापडले.नेमके काय आहे प्रकरण१३ मे रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मालजीपाडा गावात राहणारे वसंत म्हात्रे यांनी वालीव पोलीस ठाण्याला तक्र ार दिली की, मालजीपाडा येथील मोकळ्या जमिनीवर कोणत्यातरी वयोवृद्धाचा मृतदेह आहे. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात वयोवृद्धाची हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मुंबई पोलिसांनी १४ मे रोजी याच वयोवृद्धाची मिसिंगची तक्रार दाखल करून तपास करत होती. पण याचदरम्यान वालीव पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मयत वृद्धाची माहिती आणि फोटो शेअर केला होता. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागून हत्येचा गुन्हा उघडकीस आला होता. नवी मुंबईच्या कामोठे येथील सेक्टर नंबर २२ मध्ये राहणारे वयोवृद्ध रघुराम श्रीनिवास ऐथल (७२) यांचा हा हत्या झालेला मृतदेह असल्याची ओळख पटली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी