शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

दहा महिन्याच्या चिमुकलीने खेळताना पकडला विषारी साप !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 8:32 AM

लहान मुलं खेळताना काय काय हातात घेतील याचा काही नेम नाही, मात्र असाच काहीसा हृदयद्रावक प्रकार वसईच्या फादरवाडीत घडला आहे.

वसई- लहान मुलं खेळताना काय काय हातात घेतील याचा काही नेम नाही, मात्र असाच काहीसा हृदयद्रावक प्रकार वसईच्या फादरवाडीत घडला आहे. एका दहा महिन्यांच्या चिमुकलीने खेळताना चक्क घरात शिरलेला विषारी साप हातात पकडला. मात्र त्याचवेळी या विषारी सापाने या चिमुकलीला दंश केला. वसईतील फादरवाडी येथील एका बैठ्या घरात ही घटना घडली आहे. श्रीयांग झंकर ढोली, असं या चिमुकलीचे नाव असून ती अवघ्या दहा महिन्यांची आहे.

सविस्तर माहितीनुसार, शनिवारी सकाळी 7च्या सुमारास फादरवाडी येथील बैठ्या घराच्या दरवाजा जवळ श्रीयांग खेळत होती,दरम्यान पावसामुळे एक विषारी साप घरात शिरला तेव्हा श्रीयांगने खेळणं समजून या सापाला चक्क हातात पकडले, मात्र त्यानंतर सापाने तिच्या हाताला पीळ मारून दंश केला. त्यावेळी श्रीयांग रडायला लागल्याने आतील खोलीत असलेल्या आईने तिचा आवाज ऐकून तिच्याजवळ धाव घेतली असता हाताला पीळ मारलेल्या श्रीयांगच्या हातातील साप झटकून तिला तिच्या आईने तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या घटनेत तिच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू झाल्याने त्या चिमुकलीचे प्राण बचावले असून, आता ही चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.