लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : शहरातील पां.जा. हायस्कूल व स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळांतील विद्यार्थ्यांचे पूर्वीचे गणवेश सोईचे नसल्याने ते बदलून आता या वर्षीपासून नवीन गणवेशात विद्यार्थी दिसणार आहेत. पूर्वी तोकडे गणवेश असल्याने विशेषत: विद्यार्थींनींची कुचंबना होत होती. याची दखल मनसे विद्यार्थी सेनेने घेऊन तशा प्रकारचा पत्रव्यवहार दोन्ही शाळांना केला होता. दोन्ही शाळांनी त्यांची मागणी मान्य करत गणवेशात बदल केला आहे.या मागणीचा विचार दोन्ही शाळांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून गणवेशात बदल केला आहे. पां.जा.हायस्कुलचे उपप्राचार्य प्रभाकर गोतारणे व स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य सुभाष बनकर या बदलाची माहिती दिली. दरम्यान, मनसेचे तालुका अध्यक्ष कांतीकुमार ठाकरे, मनसे विद्यार्थी सेनेचे तालूका उपाध्यक्ष निखील बागुल, प्रितम पाटील, दिवेश दिनकर, चेतन रोडगे, विक्रांत ठाकरे, जितेश किणी, विजय बोरसे, हेमंत जाधव या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता.
पी.जे.,स्वामी विद्यालयाचा गणवेश बदलला
By admin | Updated: May 13, 2017 00:38 IST