शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडमध्ये पुन्हा बिबट्या

By admin | Updated: February 8, 2017 03:55 IST

पळू-सोनावळे परिसरात आॅगस्ट महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने ठार केल्यानंतरही त्या बागात बिबट्याचा संचार

मुरबाड : पळू-सोनावळे परिसरात आॅगस्ट महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने ठार केल्यानंतरही त्या बागात बिबट्याचा संचार असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला होता. मात्र तेव्हा अस्तित्व न दाखवणाऱ्या बिबट्याने सहा महिन्यांनंतर पुन्हा संचार सुरू केला असून दोन दिवसांत तीन वासरे फस्त केली आहेत. आता त्याचा वावर सरळगाव परिसरात आहे. फटाके फोडून बिबट्याला पळवून लावावे, असा सल्ला वन विभागाने दिला आहे. जुन्नरच्या पट्ट्याला मुरबाडचा डोंगराळ भाग लागून आहे. तेथे जंगलात सोडलेले बिबटे फिरत या भागात येतात. वृक्षतोडीमुळे येथील जंगले विरळ झाल्याने भक्ष्याच्या शोधात ते लोकवस्तीत येतात, असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. अवघ्या सहा महिन्यात वेगळ््या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने तेथील गाव-पाड्यांत दहशत पसरली आहे.सोनावळे येथील बारकू भोईर यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याने तो बिबट्या नरभक्षक असल्याचे जाहीर करून वन विभागाने त्याला ठार मारण्यासाठी मोहीम उघडली होती. त्यासाठी ठिकठिकाणी पंजरे, मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. ही मोहीम बरीच गाजली. बिबट्याला ठार मारण्याच्या आदेशामुळे ती चचर््ोतही आली. त्यानंतर बिबट्याला ठार मारण्यात यश आले खरे, पण अवघ्या दोनच दिवसात पुन्हा बिबट्याचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांतील भय संपले नव्हते. त्यानंतर साधारणत: सहा महिने बिबट्याने दर्शन दिले नव्हते. त्याचा वावर असल्याच्या खुणाही सापडल्या नव्हत्या. जुन्नर पट्ट्यात सापडलेले बिबटे माळशेज घाट परिसर व पुणे जिल्ह्यातील जंगल परिसरात फिरत असल्याची माहिती सतत सांगितली जाते. मुरबाड तालुक्यात वन हद्दीतील झाडांची चोरटी तोड मोठी आहे. त्याखेरीज समिधांसाठीही बेसुमार झाडे, झुडपे तोडली जात आहेत. जंगलपट्टी, वृक्ष विरळ झाल्याने तेथील वन्यप्राणी अन्न-पाण्यासाठी गाव-वस्तीकडे भक्ष्याच्या शोधात येतात. आता सरळगाव परिसरात सापडलेल्या बिबट्याने नवापाडा येथील वसंत एगडे यांच्याकडील दोन वासरे व आणखी एका शेतकऱ्याचे एक वासरू दोन दिवसात फस्त केली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. बिबट्यापासून संरक्षणासठी फटाके वाजवण्याचा सल्ला वनविभागाने ग्रामस्थांना दिला आहे. (वार्ताहर)