शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फुलांसाठी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास परवानगी; वसईतील विक्रेत्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:08 IST

मुंबई परिसरात फूलविक्री करणाऱ्या वसईतील विक्रेत्यांवर बृहन्मुंबई महापालिकडून होण्या-या कारवाई पासून दिलासा मिळणार आहे.

पारोळ : प्लॅस्टिक बंदीचा फटका बसलेल्या फुलविक्रेत्यांना फूलांच्या बांधणीसाठी ५१ मायक्रोन जाडीच्या पिशव्यांचा वापर करण्यास परवानगी देणारा अध्यादेश पर्यावरण खात्याने काढला असून त्यामुळे मुंबई परिसरात फूलविक्री करणाऱ्या वसईतील विक्रेत्यांवर बृहन्मुंबई महापालिकडून होण्या-या कारवाई पासून दिलासा मिळणार आहे.वसई तालुक्यात पश्चिम व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी फुलांची शेती करतात या भागातून दररोज चाफा, आणि जास्वंदी याचे १५ लाख नग उत्पादन होऊन ते विक्री साठी दादरच्या बाजारात नेली जातात, मोगरा, जुई, सायली, तगर, ही फुले खराब होतात म्हूणन ती प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून वसईतून दररोज मुंबईत विक्रीसाठी पाठवली जातात. परंतु पर्यावरण विभागाने प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरास बंदी घातल्याने बाजारात विक्रीसाठी न्यावयाची फुले पॅकिंग कशी करायची हा प्रश्न वसईतील शेतकºयांच्या समोर उभा राहिला. फूलांच्या बांधणीसाठी अन्य पर्याय नसल्याने हे उत्पादन ५१ मायक्रॉॅन प्लॅस्टिकच्या पिशव्यामधून मुंबईला नेत होते पण त्यावर मुंबई महापालिकेकडुन कारवाई करण्यात येत होती, बंदी नंतर शासनाने किराणा दुकानदारांना १ किलोपर्यंत सामानाच्या बांधणीसाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांना परवानगी दिली तशी परवानगी वसई तील फूलउत्पादकांना द्यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्र्यांकडे केली होती.प्लॅस्टिकबंदीमुळे फुलांची बांधणी करता येत नसल्याने वसईतील हजारो फुल बागायतदारांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. शेतकºयांनी या बाबत शासनाकडे पाठपुरावा केला तर पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांनी ही हा विषय उचलून धरला यामुळे फुलांच्या बांधणी साठी सरकारने ५१ मायक्रॉन जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. आॅगस्ट महिन्यात फुलांच्या बांधणीसाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यांचे आदेश काढण्यात आले नव्हते त्यामुळे वसई तील फुलविक्रेत्यांना मुंबई महापालिकेच्या कारवाई ला सामोरे जावे लागत असे पण आता पर्यावरण सचिवांनी ५१ मायक्रॉन च्या पिशव्या फुल बांधणीसाठी वापरण्याची परवानगी देणारा आदेश दिल्याने वसईतील फुलविक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या निर्णयामुळे वसईतील फुलविक्रेत्यांना दिलासा मिळाला असून दंडात्मक कारवाई आता मुंबई मध्ये होणार नसल्याने या निर्णयाचे फुलउत्पादकांनी स्वागत केले आहे.- सुभाष भट्टे,फूल उत्पादक, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरार