शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

पिंपळशेत, खरोड्यातील हिरवी मिरची थेट परदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:34 PM

अधिक भाव मिळणार : ४२ शेतकऱ्यांनी केली लागवड

हुसेन मेमन 

जव्हार : पिंपळशेत, खरोंडा गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेली हिरवी मिरची यंदा युरोपियन देशात विक्रीसाठी जाणार आहे. या मिरचीचा पहिला तोडा २ टन निघण्याचा अंदाज आहे. यामुळे हिरव्या मिरचीची लागवड केलेले सर्व शेतकरी कामाला लागले असून, त्यांना युरोपियन देशात अधिक भाव मिळून आर्थिक फायदा होणार आहे. जिंदाल स्टील वर्क्स आणि इकीसेंट, हैद्राबाद रुरल कमुन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आर.सी. संस्था यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पिंपळशेत, खरोंडा, हेदीचापाडा या गावातील एकूण ४२ शेतकºयांनी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे. या मिरचीला अधिक उत्पन्न मिळावे आणि आदिवासी शेतकºयांचा फायदा व्हावा, या दृष्टीने आदिवासी भागात काम करणाºया संस्थांनी हे पाऊल उचलले असून, या मिरचीची युरोपियन देशात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.लागवड केलेली हिरवी मिरची निरोगी आणि चांगल्या प्रतीची निघावी म्हणून आर.सी संस्थेच्या टेक्निकल पद्धतीने वाफे, आळे तयार करून मिरचीची लागवड करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यात झाड वाढून मिरची तयार झाली आहे. या दोनच दिवसात ही तयार मिरची तोडून विक्रीसाठी युरोपियन देशात पाठविली जाणार आहे.आदिवासी शेतकºयांची मिरची बाहेर देशात विकावी आणि त्या शेतकºयांना फायदा व्हावा, म्हणून हा वेगळा उपक्रम राबवत ही मिरची बाहेर पाठवण्याचा खर्च डेलमोंन्टे कंपनी उचलणार आहे. तसेच मिरचीला परदेशात चांगला भाव मिळवा, म्हणून मिरची विक्री आणि माल वाहतूक या सर्वांचा खर्च आर.सी. कंपनी करणार आहे.शेतकºयांना होईल चार पटीने फायदाया भागातील शेतकºयांना त्यांच्या शेतीचा फायदा कसा होईल आणि त्यांची प्रगतीही व्हावी, यासाठी आम्ही आदिवासी भागात काम करणाºया संस्थांनी वेगळा प्रयोग केला आहे. यंदा त्यांनी पिकवलेल्या हिरवी मिरचीला युरोपियन भाव मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. मिरची तयार झाली असून, दोनच दिवसात ही हिरवी मिरची बाहेर देशात विक्रीला जाणार आहे. यामुळे निश्चितच शेतकºयांना चार पटीने फायदा होईल, असा विश्वास संस्थांनी व्यक्त केला आहे.हिरवी मिरची युरोपियन देशात विक्रीला जाणार असल्याचा आनंद आम्हाला अधिक आहे. यासाठी ज्या संस्थांनी आम्हाला मदत केली आहे, त्यांचे आम्ही ऋणी आहोत. - विलास हांडवा, हिरवी मिरची शेतकरी

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर