शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराविरोधात जनता रस्त्यावर उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 01:29 IST

कार्यादेश निघाल्याने असंतोष; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

डहाणू : केंद्र सरकारने वाढवण येथील प्रस्तावित ६५ हजार ५४४ कोटींच्या महत्त्वाकांक्षी बंदरासाठी सविस्तर आराखडे तसेच अभियांत्रिकी कामे सुरू करण्याच्या बंदर उभारणीपूर्व कामांचा कार्यादेश दिल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्र सरकारने बंदर उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याने वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या बंदराविरोधात जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे.जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने जेएनपीटीने जागतिक स्तरावरील निविदा काढली होती. त्यात २८ कोटींची सर्वात कमी बोली लावणारी नेदरलँड येथील रॉयल हस्कोनिंग डीएचव्हीला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जेएनपीटीमार्फत लागणारे सविस्तर आराखडे तसेच अभियांत्रिकी कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. वाढवण बंदराच्या उभारणीसाठी प्रकल्प आराखडा, डीपीआर अद्यावत करणे, सामान्य पायाभूत सुविधासाठी अभियांत्रिकी, त्याचबरोबर खरेदी, बांधकाम ईपीसीसाठी निविदा तयार करणे आणि चार कंटेनर टर्मिनल बरोबरच, अकरा कार्गो टर्मिनलसाठी आराखडे तयार करण्याच्या कामासाठी केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाने ३० सप्टेंबर २०२० रोजी नेदरलँडच्या रॉयल हस्कोनिंग डीएचव्ही या कंपनीला २८ कोटीचे कंत्राट दिले असून त्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. या कामांतर्गत रस्ते, रेल्वे दळणवळणाने जोडणे आणि इतर सुविधांचा विकास करणे, सार्वजनिक आणि खाजगी मालवाहू हाताळणीचा समावेश आहे.समुद्रातील पर्यावरणदृष्ट्याअतिसंवेदनशील विभागात न्यायालयीन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सरकारने बंदर उभारणीच्या प्रक्रि येला सुरुवात केली आहे. हे अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी असून येथील जनतेचा विरोध आहे. या बंदराविरोधात सर्वोच्च न्यायालयात लवकरच याचिका दाखल करण्यात येणार आहे.- नारायण पाटील, अध्यक्ष, वाढवण बंदरविरोधीसंघर्ष समिती