शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘जनतेने शासकीय योजना व सुविधांचा लाभ घ्यावा’

By admin | Updated: February 23, 2017 05:25 IST

सेवा केंद्र व ई महाभूमी या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या कार्यालयामुळे विविध योजनांचा लाभ

हितेन नाईक/आरिफ पटेल / पालघर/मनोरसेवा केंद्र व ई महाभूमी या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या कार्यालयामुळे विविध योजनांचा लाभ जनतेला होणार असून जनतेने त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी येथे केले.येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगत उभारण्यात आलेले महसूल भवन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्र, मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय यांचे उद्घाटन बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले, आमदार आनंद ठाकूर, विलास तरे, अमित घोडा, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनू कुमार श्रीवास्तव, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे, उपविभागीय अधिकारी विकास गजरे,पोलिस अधिक्षिका शारदा राऊत यासह विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.या इमारतींमध्ये असलेल्या सर्व दालनांची पालकमंत्र्यांनी पाहणी करुन सुसज्ज व अद्ययावत सुविधा उपलब्ध करु न दिल्या बद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. जिल्ह्यातील २९ महसूलच्या मंडळ कार्यालयात ह्या सुविधा निर्माण करून देण्यात आल्या असून शासनाचा खर्च न होता नाविन्यपूर्ण उपक्रम जनतेपर्यंत पोहोचिवणे आता सहज शक्य होणार असल्याचे पालक मंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या हस्ते तलासरी तालुक्यातील दांगड पाड्यातील वनिता लक्ष्मण हाडळ या महिलेच्या दोन बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. त्याबद्दल तिला वनविभागाकडून नुकसान भरपाईचा धनादेश पालक मंत्र्याच्या हस्ते देण्यात आला.या केंद्रात ठेवण्यात आलेल्या किआॅस्कद्वारे डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा, भूमी अभिलेख, ग्रामविकास, नगरविकास, कृषी व वन विभाग व अन्य ३४ विभागांच्या ३१७ सेवा मिळणार असून त्याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दाखविले. तसेच बी टू सी (इ४२२्रल्ली२२ 2 उ्र३्र९ील्ल) अंतर्गत पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट या प्रमाणे केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या अंतर्गत लाईट बील, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, एलआयसी प्रिमीअम इ. सेवा आॅनलाईन पध्दतीने देण्यात आल्या असल्याने तात्काळ लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.ी-ऊ्र२ल्ल्रू प्रणाली मार्फत नागरिकांना महसूली न्यायालयातील दाव्यांचा शोध, स्थिती, निकाल व सुनावणी वेळापत्रक आॅनलाईन पध्दतीने पाहणे तसेच न्यायनिर्णयाची प्रत प्राप्त करून देणे सोईस्कर होणार आहे. वरील सर्व प्रकारच्या सेवांंसाठी डिजीटल पध्दतीने ऊ्रॅ्र३ं’ ढं८ेील्ल३ एल्लुं’ी िरी१५्रूी२ ने रक्कम अदा करण्याची सुविधा ङ्रङ्म२‘ मध्ये उपलब्ध केलेली आहे. या ङ्रङ्म२‘ च्या माध्यमातून माईक्रो एटीएमव्दारे २०००/- पर्यंतची रक्कम काढण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. मनोर येथे मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी ह्यांची बडदास्त ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रशस्त महसूल भवनाचे बुधवारी पालकमंत्री विष्णू सवरा आणि महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याने त्या भवनाच्या शेजारील जागेत सन १९८० साला पासून राहणाऱ्या रमेश यादव यांचे घर कोणतीही पूर्व सूचना न देता एका रात्रीत जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे त्यांचे कुटुंब सध्या रस्त्यावर आले असून त्यांच्या कडे घरपट्टी, पाणीपट्टी तसेच वीज बिल भरणा केल्याची कागदपत्रे असतांनाही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या या युद्धपातळीवरील कारवाईचा फटका एका गरीब कुटुंबाला बसला असून या कुटुंबाची माहिती घेऊन योग्य ती नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.