शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाऱ्या दुचाकीचालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:08 IST

वाहतूक शाखेची कारवाई । ठाकुर्ली म्हसोबा चौकात सम-विषमचे फलक

डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौकात ठिकठिकाणी लावलेले नो-पार्किंगचे फलक काढून हा परिसर आता सम-विषम पार्किंग (पी-१, पी-२) करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील फलक लावले असून, त्याप्रमाणे डोंबिवली वाहतूक शाखेने कारवाईलाही सुरुवात केली आहे. नियम मोडणाºया दुचाकीचालकांना शुक्रवारी २०० रुपये ई-चलन दंड ठोठावण्यात आला आहे.

ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्याच्या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिल्याने या भागात वस्ती वाढली आहे. मात्र, तेथे वाहनतळ नसल्याने म्हसोबा चौकातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दुचाकींचे पार्किंग केले जात आहे. कामावर जाणाºया नोकरदारवर्गाला आपली दुचाकी वाहने नाइलाजास्तव तेथे उभी करून रेल्वेस्थानकाची वाट धरावी लागत आहे. परंतु, याठिकाणी होणाºया पार्किंगमुळे ठाकुर्लीहून कल्याण दिशेने जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे याठिकाणी वाहने पार्क होणार नाहीत, अशी भूमिका वाहतूक शाखेने घेतली होती. त्यानुसार चौकात सुरुवातीला नो-पार्किंगचे फलक लावण्यात आले होते.पण, कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. परंतु, वाहनचालकांची होणारी गैरसोय आणि चौकातील वाढत्या पार्किंगवर पर्याय म्हणून अखेर ‘पी-१, पी-२’ पार्किंगची अंमलबजावणी करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला. त्यानुसार, तेथील नो-पार्किंगचे फलक काढून तेथे ‘पी-१, पी-२’ चे फलक लावण्यात आले. कल्याणहून ठाकुर्लीक डे येणाºया रोडवर म्हसोबा चौकात २, ४, ६, ८ या सम तारखेला वाहन पार्क करता येईल, तर ठाकुर्लीवरून कल्याणच्या दिशेला जाणाºया रोडवर १, ३, ५, ७ अशा विषम तारखेला वाहन पार्क करता येईल, अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे या चौकात दोन्ही दिशांना सम आणि विषम तारखेप्रमाणे आलटूनपालटून वाहने पार्क करावी लागणार आहेत. परंतु, दुचाकीचालकांनी सवयीप्रमाणेच पार्क करणे सुरू ठेवल्याने शुक्रवारपासून संबंधित विभागाने कारवाईलाही सुरुवात केली आहे. यात नियम मोडणाºया दुचाकीचालकांना ई-चलन दंड ठोठावण्यास प्रारंभ झाला आहे.नियम मोडणाऱ्यांवर कारवाईप्रारंभी नो-पार्किंगचा निर्णय घेण्यात आला होता. पण, दुचाकीचालकांची गैरसोय होता कामा नये, म्हणून पी-१, पी-२ चा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. तसे फलकही लावले असून, नियम मोडणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. याउपरही नियम मोडणे सुरूच राहिले तर क्रेनद्वारे वाहने उचलली जातील, असे डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार