शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील पेल्हार, उसगाव, पापडखिंड धरणे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:27 IST

उशिरा येऊन जोरदार बरसला : जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो; पाणीप्रश्न निकाली निघणार

वसई : १५ जूननंतर दीड महिन्यांच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील ४ पैकी ३ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तसेच नदी, नाले, विहिरी, तळी तुडूंब भरली आहेत. २८ जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पालघर तसेच वसई - विरारमध्ये एक हजार मिमी.पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी सुखावला आहे. पालघर जिल्ह्यात धामणी - सूर्या या मुख्य धरणासहीत अन्य तीन मध्यम आणि लहान स्वरूपाची धरणेही जिल्हावासीयांची तहान भागवत आहेत. वसई तालुक्यातच पेल्हार, उसगाव आणि पापडखिंड अशी तीन धरणे कार्यरत आहेत. पैकी विरार पूर्वेतील पापडखिंड धरण वसई विरार शहर महापालिकेने गतवर्षी बंद केले आहे.

जिल्ह्यातील ४ धरणांपैकी वसई तालुक्यात असणारी ३ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. धामणी - सूर्या हे मुख्य धरण वगळता ३ धरणे शंभर टक्के भरली असून, धामणी ८८ टक्क्यांपर्यंत भरले आहे. सर्वच धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे वसई विरार महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी लोकमतला सांगितले.विक्रमगड तालुक्यात जोरदार पाऊस; वाहून गेल्याने एकाचा मृत्यूविक्रमगड : तालुक्यात सतत पडणाºया पावसामुळे खांड बंधारा, सजन बंधारा, ताबाडी नदी, देहजा नदी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. हा पाऊस असाच राहिला तर धोक्याची पातळीही ओलांडण्याची भीती आहे. या परिसरातील अनेक लहान मोठ्या पुलावरून रोज पाणी वाहून वाहतूक बंद पडण्याच्या घटना घडत आहे. या पुरामुळे तालुक्यातील वेढे, चरी, डावरे पाडा येथील पांडू भिवा डावरे हे आपले काम आटपून घरी जात असताना घाणेडा येथील पुलावरून पाय घसरून पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायांकळी घडली. बुधवारी एका शेतात हा मृतदेह मिळाला. याबाबत तहसीलदारांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.चिंता होती; ती गेली !गेल्यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. महिनाभर पाऊस गायब झाला. मात्र जुलैमध्ये पावसाने हाहा:कार उडवून दिला. वसई विरार महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे यावर्षी जराही पाणीकपात करावी लागली नाही. यंदाही मान्सून अपेक्षेपेक्षा २० दिवस उशीरा दाखल झाल्याने गतवर्षीचीच परिस्थिती उद्भवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, २० जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या तीन आठवड्यांतच महिन्याची सरासरी भरून काढल्याने जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार