शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या पूर्वसंध्येला हरवलेले लाखोंचे २७ मोबाईल पेल्हार पोलिसांनी नागरिकांना केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2023 14:50 IST

मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी पेल्हार पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, पेल्हार पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला परत केले आहेत. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी अंदाजित अडीच लाख रुपये किंमतीचे २७ मोबाईल फोनचा शोध घेऊन तक्रारदार आणि मूळ मालकांना ते परत केले आहेत.

पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी २ ते ३ महिन्यांपूर्वी हरवलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती घेत विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. त्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी पेल्हार पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

मोबाईल ही नागरिकांसाठी महत्वाचा विषय असतो. चोरी गेल्याने आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय अनेकांचा महत्वाचा डाटाही जातो. त्यामुळे यासंबंधित नागरिकांच्या भावना वेगळ्या असतात. मोबाईलची कधी चोरी होते, तर कधी हरवतो. पोलिसांकडून दाखला मिळवून नवे सिमकार्ड मिळवून अनेक जण नवा मोबाईल सुरू करतात. असे असले तरी त्यांच्या दृष्टीने हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल तेवढाच महत्वाचा असतो. त्याचा शोध घेता येत नाही, तक्रारही नोंदवून घेतली जात नाही, यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांचे मत खराब होते. तर दुसरीकडे चोरांचे धाडस वाढते. त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांनी यासाठी खास मोहीम राबविण्याचे ठरविले. आपल्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांना कामे वाटप केले. तांत्रिक मदत आणि पारंपरिक तपास पद्धतीचा अवंलब करून विशेष मोहिमेत त्यांनी मोबाईल परत मिळविण्यास यश मिळविले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, संजय मासाळ, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी