शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘भातशेतीची भरपाई द्या, भीक नको’; शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:05 IST

नुकसानीच्या तुलनेत भरपाई अत्यल्प

- हुसेन मेमन पारोळ : वसई तालुक्यात परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले. पीक तसेच तण वाया गेल्याने यावर्षी मोठा खर्च करु नही शेतकऱ्यांच्या हाताला काही लागलेच नाही. भातशेतीसाठी केलेला मोठा खर्च यंदा वाया गेला. यामुळे शासनाने केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यातून काही तरी मिळेल ही आशा बळीराला होती पण शासनाने हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान भरपाई दिल्याने ती प्रति गुंठा अवघी ८० रुपये होते. ही भरपाई नुकसानीच्या १० टक्केही नसल्याने ‘नुकसानीची भरपाई द्या, भीक नको’, असे वसईतील शेतकऱ्यांनी शासनाला ठणकावले आहे.भातशेती नुकसानीच्या भरपाईबाबत शासनाने धोरण ठरवून हेक्टरी ८ हजार रु पये आणि बागायतीसाठी १८ हजार रुपये भरपाई जाहीर केली. पण एक हेक्टर भात शेतीचा खर्च पाहता ही भरपाई कमी असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. भातशेती करताना बियाणे, खते, मजुरी, ट्रॅक्टर या भात लावणीच्या खर्चासोबत निंदणी, कापणी, बांधणी, झोडणी या साठी प्रति हेक्टरी ४० ते ५० हजारांचा खर्च येतो. तर या हंगामी खर्चासाठी सहकारी सोसायटी ही प्रति हेक्टरी ४० पीक कर्ज देते आणि शेतकरी आलेले पीक तसेच भाताचे तण विकून घेतलेल्या कर्जाचा भरणा करतात.पण यावर्षी पीक आणि तणही पावसामुळे वाया गेले. तर नुकसानभरपाईही कमी प्रमाणात जाहीर झाल्याने पीक कर्ज कसे फेडायचे हा पेच शेतकºयांच्या पुढे उभा राहिला आहे. एकीकडे शेतकºयांच्या प्रति गुंठा भात उत्पादनात वाढ होत असताना या भाताचा शासकीय खरेदीत दर १७०० व बोनस ३०० रुपये एवढा असल्याचे कळते. म्हणजेच २१ रु पये किलो हा शासनाचा खरेदीचा दर आहे. त्यानुसार एका गुंठ्याला ५०० ते ६०० रु पयाचे भात उत्पादन आहे. मात्र शासनाकडून केवळ ८० रुपये प्रति गुंठा एवढी कमी नुकसानभरपाई मिळणार आहे. ही भरपाई उत्पादनाच्या तुलनेत फारच कमी असल्याने शेतकºयांकडून तीव्र नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.एकीकडे परतीच्या पावसामुळे शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याने शंभर रुपयाच्या नुकसानीला शासनाची केवळ १० रु पये मदत म्हणजे शेतकºयांची क्रूर चेष्टा आहे.-लक्ष्मीप्रसाद पाटील, शेतकरीपावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले असून त्यांना देण्यात येणारी हेक्टरी नुकसान भरपाई कमी आहे. शासनाने याचा पुन्हा विचार करून हेक्टरी योग्य दर द्यावा.- राजेश पाटील, आमदार बोईसर

टॅग्स :Farmerशेतकरी