शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी जवानांकडून तलासरीत पॅरामोटरींगची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:56 IST

देशातील तरुण आर्मीकडे आकर्षित व्हावे हा उद्देश; भूज येथून डेअर डेव्हीलचे पथक जाणार सिकंदराबादला, नागरिकांत उत्सुकता

- सुरेश काटे तलासरी : भारतीय सेनेच्या भूज येथील लष्करी तळावरून १७ डेअरडेव्हीलची टीम पॅरामोटरच्या साहाय्याने सिकंदराबादला निघाली असून तलासरीत त्यांचे मंगळवारी आगमन झाले. भूज येथील सैनिकी केंद्रावरून १७५० किलोमीटर चे अंतर पार करून ते सिकंदराबाद येथे पॅरामोटरने पोहचणार आहेत. यामध्ये मेजर अमित जगदाळे व सुभेदार विजय सिंग यांच्यासह १० पायलट व २ प्रशिक्षक सहभागी असून आर्मीची कार आणि ट्रक देखील त्यात आहे.देशातील सामान्य जनतेचा लष्कराशी संपर्क यावा, नागरिकांमध्ये लष्कराबाबत जागृती निर्माण व्हावी आणि देशातील तरुण लष्कराकडे आकर्षित व्हावेत आणि साहसी खेळाबाबत तरुणांमध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी भारतीय सेनेतर्फे सेलिब्रेटिंग द स्पिरिट आॅफ अ‍ॅडव्हेंचर हा उपक्रम जनतेपर्यंत पोहचण्यासाठी हाती घेतल्याचे पथकप्रमुख मेजर अमित जगदाळे यांनी सांगितले. यावेळी ठक्कर बाप्पा विद्यालयातील विद्यार्थ्यांना पॅरामोटरींगच्या साहाय्याने आकाशात उड्डाण व यशस्वी लँडिंग करून विविध प्रात्यक्षिक सेनेच्या टीमने दाखविलीत.काय आहे, पॅरामोटारींगपॅरामोटारींग हा पॅराग्लायडींगचा प्रकार आहे. ग्लायडींगमध्ये तुम्ही ग्लायडर मध्ये बसून एखाद्या उंच टेकडी अथवा डोंगरावरून खाली झेप घेतात आणि हळू हळू खाली येतात. परंतु पॅरा मोटारींगमध्ये तुम्हाला डोंगरावर अथवा उंच स्थानी जाण्याची गरज नसते तर तुम्ही पायानी गती घेणाऱ्या अथवा चार चाके असलेल्या स्वयंचलित अशा इंजिनाचा वापर करून ग्लायडींगला गती देतात. त्यासाठी पायलट व ग्लायडरच्या वजनानुसार ५० ते ३५० सी.सी.चे अ‍ॅटोमोबाईल इंजिन वापरतात. हे इंजिन पेट्रोल अथवा डिझेलवर चालविले जाते. हे चालविणे व नियंत्रीत करणे अवघड असते. त्यामुळे त्याचे ज्यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. अशाच व्यक्ती ते चालवू शकतात. त्यामुळेच ते चालविण्याचा साहसी खेळ लोकप्रीय असला तरी त्याचा प्रसार फारसा झालेला नाही. कोणत्याही सपाट प्रदेशावरून अथवा ज्यावर कापड अथवा तत्सम बाब अंथरुन जो सपाट केला आहे. अशा भागावरून पॅरामोटारींग करता येते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानStudentविद्यार्थी