शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्याचे औद्योगिक भवितव्य उज्ज्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:30 IST

आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे

आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे किंवा अपेक्षे इतका जिल्ह्याचा विकासाचा गाडा जात नसला तरी सकारात्मक दृष्टीने घेण्यांत येणारे निर्णय व पोषक वातावरणामुळे सर्व बाबी बरोबर च उद्योगाच्या विकासालाही चालना मिळत असून मुबई आणि गुजरात च्या मध्यभागी असलेल्या पालघर जिल्ह्याचे उद्योग क्षेत्रातिल भविष्य उज्वल आहे परंतु त्या करीता अधिक पायभूत सुविधा जलद गतीने उपलब्ध करून संबंधित कार्यालये सुरु करण्याची नितांत गरज आहेआठ तालुके मिळून देशाच्या व राज्याच्या नकाशावर उदयास आलेल्या पालघर जिल्ह्यामधे महाराष्ट्रातील अग्रगण्य समजली जाणारी तारापुर एम आय डी सी, देशातील महत्वाचा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा तारापूर अणूऊर्जा केंद्रातील चार अणुभट्या, भाभा अणू संशोधन केंद्र ( बी ए आर सी) डहाणूचा रिलायन्स एनर्जीचा प्रकल्प व फुगे उद्योगाबरोबरच पालघर, वसई, वाडा, या सर्व तालुक्यांमध्ये लहान, मध्यम व मोठ्या स्वरूपाचे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत. मासेमारी, शेती, बागायती, वीटनिर्मित, बांधकाम साहित्य पुरवठादार इत्यादी व्यवसायांमध्ये आज लाखो कामगार काम करीत आहेतजिल्हा निर्मिती नंतर तसेच येणाºया काळा मध्ये मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरण, नवीन रस्त्यांच्या बांधणीचे नियोजन, कापड (टेक्सटाइल्स) उद्योगाला आवश्यक असणाºया कौशल्याचे कामगारांना देण्यात आलेले प्रशिक्षण त्यामुळे भाविष्यात निर्माण होणारे मिळणारे कुशल मनुष्यबळ जिल्ह्यामधे दुसरी एमआयडीसी उभारण्याबाबतची चाचपणी, नव्याने येवू पाहणारा केळवा येथील विमान उद्योग या सर्व आशादायी घटनांमुळे पालघर जिल्ह्याचे औद्योगिक महत्व वाढणार आहे हे निश्चित आहे.नव्याने जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक व रासायनिककारखान्यांच्या तपासणीकरीता स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीमुळे प्रदूषण व औद्योगिक अपघातावर नियंत्रण येइल, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाचे कार्यालय स्थलांतरित करण्या साठी घेतलेला पुढाकार, कामगार विभागाचा घेण्यांत येणारा सकारात्मक आढावा, तारापूर एम आय डी सी चा नियोजनबद्ध विकासाचा घेतलेला ध्यास या बाबी उद्योगवाढीसाठी महत्वपूर्ण आहेत.दुर्गम भागातील रोजगारांसाठी कुटुंबासह स्थलांतरीत होणारी आदिवासी कुटुंबे व त्यामुळे उदभवणाºया समस्या दूर करण्याकरीता त्यांंना त्यांच्या गावातच फळ, भाज्या, मोगरा, कुक्कुटपालन ई. व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देवून त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक कालबध्द कार्यक्र म जिल्हास्तरावरून आखला जातो आहे तो आशादायी असा आहे. फक्त त्याला योग्य नियोजनाच्या अंमलबजावणीची गरज आहे.-पंकज राऊत, बोईसर