शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

पालघरची मुख्यालये लवकरच साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:35 IST

या जिल्ह्याच्या मुख्यालयासह पाच कार्यालयांच्या उभारणीसाठी निविदा प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी सुरू आहे. त्याची निश्चिती लवकरच होऊन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची उभारणी होणार आहे.

हितेन नाईक ।पालघर : या जिल्ह्याच्या मुख्यालयासह पाच कार्यालयांच्या उभारणीसाठी निविदा प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी सुरू आहे. त्याची निश्चिती लवकरच होऊन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची उभारणी होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी जमीन सिडकोकडे वर्ग करण्यात आली आहे. तसेच त्यासाठी आवश्यक तो निधिही उपलब्ध करुन दिला जाणार आहे.कोळगांव येथील ४४०हेक्टर जमिनीपैकी १०३ हेक्टर जमिनीवर जिल्हाधिकारी कार्यालय, दोन प्रशासकीय कार्यालये, जिल्हा पोलीस कार्यालय आणि जि.प. कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कार्यालयांच्या बांधकामासाठींच्या निविदाही काढण्यात आलेल्या आहेत. या पाचही इमारतींसाठी १६२ कोटी ११ लाख २७ हजार ३६ इतकी अंदाजपत्रकीय रक्कम निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयासाठी मिळालेल्या जागेत विविध पॉकेट्स तयार करण्यात आलेली असून त्यापैकी क्रमांक १ च्या पॉकेटमध्ये ते उभे राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत १५४९८ चौ.मी. क्षेत्रफळाची असून तिचा खर्च ३७ कोटी ७२ लाख ८९ हजार ११३ रूपये आहे. या कामासाठी १२ निविदा प्राप्त झाल्या असून तिची निश्चिती सुरू आहे. जिल्हा परिषदेचे कार्यालय २४ हजार ३४६ चौ.मी.वर उभे राहणार असून त्यासाठी ३७ कोटी ७३ लाख २७ हजार ९४९ रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी ११ निविदा प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व कार्यालये या एकाच इमारतीत साकारण्यात येणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ३ हजार ९०० चौ.मी. क्षेत्रात उभारण्यात येणार असून त्यासाठी १२ कोटी २३ लाख ८२ हजार ९८३ रूपये खर्च होणार आहेत. त्यासाठी १६ निविदा प्राप्त झाल्या आहेत. तर प्रशासकीय कार्यालयाच्या इमारत क्रमांक ए आणि बी साठी अनुक्रमे ३७ कोटी ८३ लाख ८३ हजार ४२३ रुपये तर बी साठी ३६ कोटी ५७ लाख ४३ हजार ५६५ रुपये इतका खर्च येणार असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे १५८६८ आणि १५४९८ चौ.मी. असेल. त्यासाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. जव्हार येथील प्रसिद्ध राजवाड्याच्या वास्तू रचनेनुसार या इमारतींची रचना असणार आहे. त्यात आदिवासी संस्कृतीचे प्रतिबिंब देखील जाणिवणार आहे.सिडकोला जिल्हा मुख्यालय व नवे पालघर वसविण्याचे काम दिल्यानंतर तिने नव्या पालघरचाही आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्हा मुख्यालय व नवे पालघरसाठी अनुक्रमे १०३ व ३३७ हेक्टर जमीन सिडकोकडे वर्ग करण्यात आलेली आहे. एकूण ४४० हेक्टरमध्ये सिडकोने ७ पॉकेट्स तयार केले आहेत. पहिल्या पॉकेटमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि दोन प्रशासकीय कार्यालये असतील. याशिवाय जिल्हा व सत्र न्यायालय व शासकीय विश्रामगृह, आॅडीटोरीयम व कर्मचारी निवासस्थाने यांचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे.विशेष म्हणजे लवकरच पालघर आणि बोईसर मिळून नवी महानगरपालिका होणार असून तिच्या मुख्यालयासाठी या आराखड्यात जागा राखीव ठेवण्यात आली आहे. या परिसराची भौगोलिक पहाणी व मृदा परिक्षण पूर्ण झालेले आहे. या इमारतींच्या आराखड्यांची तपासणी करण्यासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती करण्यात आली आहे.