शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

सर्वच राजकीय पक्षांचे ‘एकला चलो रे’, जिल्हा परिषद निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:17 IST

पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

पालघरजिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी एकूण ३६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये पालघरमधून ८८, विक्रमगडमधून ७८, जव्हारमधून २०, वाडामधून ४०, मोखाडामधून १५, डहाणूमधून ७१, तलासरीमधून २९ तर वसईमधून २३ अर्ज दाखल झाले आहेत. तसेच पंचायत समितीसाठी एकूण ६६७ अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी पालघरमधून १८४, विक्रमगडमधून ९१, जव्हारमधून ४३, वाडामधून ९२, मोखाडामधून ३८, डहाणूमधून ११५, तलासरीमधून ५७, वसईमधून ४७ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांच्या आघाडी तसेच युती करून निवडणूक लढवण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार स्वतंत्ररीत्या मैदानात उतरवले आहेत.माघारीपूर्वी की निकालानंतर आघाडी?पारोळ : वसई तालुक्यात आठ गण आणि चार जिल्हा परिषद गटांसाठी ७ जानेवारी रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप, श्रमजीवी संघटना यांचे या निवडणुकीत गणित न जुळल्याने प्रत्येक पक्षाने आपापले स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले आहेत. थोडक्यात, यावेळी वसईतील सर्व राजकीय पक्षांनी ‘एकला चालो रे’ची भूमिका घेतली. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दरम्यान या पक्षांमध्ये युती, आघाडी व काही वाटाघाटी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वसई तालुका हा नागरी, सागरी, व डोंगरी अशा स्वरूपात विस्तारला असून येथे ३१ ग्रामपंचायती आहेत. काही गावांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी ६ आणि जनआंदोलन यांनी २ जागा ताब्यात घेतल्या होत्या. त्य ावेळी शिवसेना आणि जन आंदोलन यांची युती होती. बहुजन विकास आघाडीने जास्त जागा मिळवत पंचायत समितीवर सत्ता मिळवली होती. आधीच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत असल्याने वसई पंचायत समितीतही वेगळी गणिते दिसणार. राज्यात बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. तर पालघर जिल्हात आघाडी एकत्र लढल्यास यात बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का, हा एक प्रश्न आहे. श्रमजीवी संघटनाही आपले पत्ते उघड करत नसल्याने त्यांनीही पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर महाविकास आघाडीने वसई पंचायत समिती निवडणूक लढवली तर काँग्रेस व राष्ट्रवादीलाही वाटा द्यावा लागेल.गेल्या निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येत बहुजन विकास आघाडी विरोधात निवडणूक लढवल्याने या निवडणुकीत शिवसेना, भाजप, श्रमजीवी संघटना, वसईपुरते तरी एकत्र येतात का, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. पण विधानसभा सभा निवडणूकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि सर्व राजकीय समीकरणे बदलली. युती तुटल्यामुळे वसई तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत युती फिस्कटली. पक्षश्रेष्ठींनी युती-आघाडीबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने सर्व पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी प्रयत्नवसई तालुक्यातील भाताणे, मेढे, तिल्हेर, चंद्रपाडा, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, कळंब, वासळई या आठ गणांवर पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये भाताणे गणासाठी मागासवर्ग प्रवर्ग, मेढे व अर्नाळा किल्ला गणासाठी सर्वसाधारण जागा, तिल्हेर गणासाठी मागासवर्ग प्रवर्ग महिला, चंद्रपाडा आणि कळंब येथे अनुसूचित जमाती महिला, तर वासळई गणासाठी सर्वसाधारण महिला आणि अर्नाळा येथे अनुसूचित जमाती अशा जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे पंचायत समितीच्या सर्वसाधारण आरक्षण असलेल्या जागेवर उमेदवारांची मोठी भाऊगर्दी असल्यामुळे पक्षातील अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरले आहेत.भाजप, कुणबी सेना, श्रमजीवीची युती?वाड्यात शिवसेना स्वबळावर? : अन्य राजकीय पक्षही रिंगणातलोकमत न्यूज नेटवर्कवाडा : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या ७ जानेवारी २०२० रोजी होणार त्यासाठी अर्ज (नामनिर्देशन पत्र) भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. तहसीलदार परिसरात कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. वाडा तालुक्यात भाजप, कुणबी सेना आणि श्रमजीवी संघटना यांची युती होण्याची चिन्हे आहेत. तर शिवसेना स्वबळावर लढत आहे. काँग्रेस, राष्टÑवादी, निलेश सांबरे यांची विकास आघाडी, बहुजन विकास आघाडी यांची आघाडी आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, मनसे हे पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट असून पंचायत समितीचे बारा गण आहेत. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. उमेदवार तसेच त्यांच्या पाठिंब्यासाठी कार्यकर्ते यांची संख्या मोठी होती.शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण : शिवसेनेतील निष्ठावंताना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने आबिटघर, मोज, गारगाव, पालसई या गट - गणात बंडखोरह होणार असून त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.मनसेची निष्ठावंतांना उमेदवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सापने, गालतरे, गारगाव आणि खुपरी या चार पंचायत समितीच्या गणात उमेदवारी अर्ज दाखल केले असून मनसेने निष्ठावंतानाच उमेदवारी दिल्याचे तालुका सचिव देवेंद्र भानुशाली यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघरzpजिल्हा परिषद