शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पालघर : ऐन दिवाळीत रेशनवर खडखडाट? : मंगळवारपासून काम बंदचा दिला इशारा, पुरवठा कर्मचारी संपावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:46 IST

गेल्या चार वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने निर्देश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊन आदेश जारी होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र महसूल कर्मचारी (पुरवठा विभाग) संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे.

हितेन नाईक पालघर : गेल्या चार वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने निर्देश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊन आदेश जारी होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र महसूल कर्मचारी (पुरवठा विभाग) संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे. त्यामुळे ऐ दिवाळीत रेशनवरील धान्य पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. राज्यासह पालघरमधील पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी पदोन्नत नायब तहसीलदारांसमवेत १० आॅक्टोबरपासून हे कामबंद आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय ते मागे न घेण्याचा इशाराही यावेळी दिलेला आहे.२०१२ पासून ते २०१५ पर्यंत महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध पद्धतीने राज्यासह पालघरातही हि आंदोलने केली होती. या आंदोलनात विविध मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्या गेल्या व तसे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले त्याचबरोबरीने २०१४ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव, वनविभाग आदी विभागांच्या सोबत बैठका करून संघटनांनी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मांडल्या गेल्या तदनंतर त्यातील काही मागण्या मान्य केल्या गेल्या व त्याबाबतीतील शासन निर्णय जारी करण्याविषयीची आश्वासनेही देण्यात आली होती. मात्र आजपावेतो या मान्य मागण्याबाबतीत कोणताही शासन निर्णय अंमलात न आल्यामुळे हे कर्मचारी त्यांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्याअनुषंगाने आपल्या मागण्यांसाठी पुन्हा कामबंद आंदोलन सुरु करण्याचा इशारा राज्यातील कर्मचाºयांनी दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार