शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पं. स.वर पुन्हा सेनेचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:14 IST

पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ३४ पैकी २३ जागांवर निर्विवाद यश मिळून शिवसेनेने पुन्हा एकदा आपला गड कायम राखला आहे.

पंकज राऊत बोईसर : पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ३४ पैकी २३ जागांवर निर्विवाद यश मिळून शिवसेनेने पुन्हा एकदा आपला गड कायम राखला आहे. या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी तसेच भाजपची गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पीछेहाट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने आपले खाते उघडले आहे.पालघर पंचायत समितीच्या ३४ गटांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून तारापूर एमआयडीसीमधील टीमा सभागृहाच्या आवारात करण्यात आली. त्यावेळी प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. जसजसे निकाल जाहीर होत होते तशी गर्दी कमी होत होती. शिवसेनेने पालघर पंचायत समितीच्या ३४ पैकी ३२ गणांमध्ये आपले उमेदवार उभे करून २३ उमेदवार निवडून आणले आहेत. २०१५ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेन १९ जागा जिंकल्या होत्या, तर बहुजन विकास आघाडीच्या १८ पैकी ४ उमेदवार, भाजपचे २४ पैकी केवळ २ उमेदवार निवडून आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी २ आणि मनसेने १ तर २ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. २३ जागांवर विजय मिळवून सेनेने तालुक्यातील आपली विजयी घोडदौड कायम ठेवलीे, तर शिवसेनेने सरावलीची जागा बिनविरोध निवडून आणून आपले खाते उघडले होते. या निवडणुकीत मान गटातून मनसेचे योगेश पाटील २३६४ सर्वाधिक मतांनी विजयी झाले तर सर्वात कमी ४७ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद पंडित हे निवडून आले आहेत.>शिवसेनेचे विजयी उमेदवारस्मीता पवार (तारापूर), रु चिता गोवारी (कुरगाव), तुळशीदास तामोरे (दांडी ), मनिषा पिंपळे (नवापूर), तनुजा राऊत (सालवड), श्वेता देसले (पास्थळ), वासंती दुमाडा (काटकरपाडा -बोईसर), मुकेश पाटील (सरावली - अवधनगर), वैभवी राऊत (सरावली- बिनविरोध ), निधी बांदिवडेकर (शिगाव खुताड ), कस्तुरी पाटील (बºहाणपूर), भालचंद्र मढवी (टेण), रंजना म्हसकर (मनोर), दिलीप पाटील (सावरे-एम्बुरे), तुषार पाटील (दहिसरतर्फे मनोर ), सीमा पाटील (नंडोरे - देवखोप), जितेंद्र मेर (मुरबे), हर्षदा तरे (सातपाटी), शैला कोलेकर (शिरगाव), भारती सावे (केळवा), मीना धोडी (मायखोप), रेखा तरे (एडवण), तुकाराम सुमडा (विराथन बुद्रुक)बहुजन विकास आघाडीचे विजयी उमेदवार (गण)अनिल रावते (दांडीपाडा ), विनोद भावर (उमरोळी), रु पेश धांगडा (सफाळे ), सुरेश तरे (नवघर घाटीम)भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार (गण)अजय दिवे (बोईसर ), सलोनी वडे (बोईसर )राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार (गण)आनंद पंडित (खैरेपाडा), चेतन पाटील (धुकटण )मनसेचे योगेश पाटील (मान गट)महेंद्र अधिकारी (कोंढाण), तनुजा (माहीम) हे २ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद