शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जि.प. : शिक्षकभरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 02:57 IST

शिक्षक भरतीत स्थानिक तरु णांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला असून आपल्या स्वनिधीतून होणाऱ्या भरतीत स्थानिकांना सामावून घेण्यात येणार आहे.

पालघर : शिक्षक भरतीत स्थानिक तरु णांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला असून आपल्या स्वनिधीतून होणाऱ्या भरतीत स्थानिकांना सामावून घेण्यात येणार आहे. विधान परीषदेचे आमदार निरंजन डावखरे यानी या बाबत जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले आहेतकोकणात स्थानिक बेरोजगार तरुणांना शिक्षक भरतीत प्राधान्य देण्याची मागणी होत असतानाच पालघर जिल्हा परिषदेने आपल्या स्वनिधीतून होणाºया शिक्षक भरतीत स्थानिक तरु णांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे आभार मानले आहेत. तसेच पालघर जिल्ह्या व्यतिरिक्त रिक्त जागा राहिल्यास कोकणातील उमेदवारांनाही प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.शिक्षण विभागात दहा वर्षांपासून शिक्षकांची भरती झालेली नाही. अशा परिस्थितीत कोकणातील स्थानिक तरु णांमध्ये अस्वस्थता आहे. त्या अनुशंगाने नऊ महिन्यांसाठी मासिक आठ हजार रु पये मानधनावर पदवी व बी. एड. शैक्षणिक अर्हता असलेल्या १२० उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी येत्या १९ जुलैपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांची गुणांच्या आधारे नियुक्ती केली जाणार असल्याचे पालघर जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे.पालघरचा पॅटर्न कोकणातपालघर जिल्ह्याप्रमाणेच कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांमध्ये स्थानिक तरु णांच्या भरतीचा पालघर पॅटर्न राबविण्याची गरज आहे. त्यातून स्थानिक बेरोजगार शिक्षकांना नोकरी मिळू शकेल. कोकणात हा पॅटर्न राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी प्रतिक्रि या व्यक्त करताना पत्रकारांना सागीतले.

टॅग्स :Teacherशिक्षकnewsबातम्या