शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालघर लोकसभेची पोटनिवडणूक : श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:39 IST

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने अखेर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

- हितेन नाईक/सुरेश काटेपालघर/तलासरी - पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने अखेर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या अकाली मृत्यूनंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी, शिवसेनेकडून वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा हे शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी घोषणा सकाळी करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता हुतात्मा स्तंभाला वंदन करून, शिवसेनेने ८ ते १० हजार शिवसैनिकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, ठाण्याचे खासदार राजन विचारे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित घोडा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार शांताराम मोरे, आमदार किणीकर, सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण आणि चिंतामण वनगा यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.ज्या भाजपासाठी दिवंगत वनगा यांनी आयुष्याची ३५ वर्षे वेचली; त्यांच्या कार्याची, त्यागाची किंमत भाजपाला समजली नाही. श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, सेनेने वनगा कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून, सेना आणि आमचे कार्यकर्ते वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी राहतील, असा विश्वास शिंदे यांनी दिला. दिवंगत वनगा यांचे अपुरे कार्य पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक लढविली जात असल्याचे ते म्हणाले. श्रीनिवास वनगांना निवडून आणणे हीच वनगांना खरी श्रद्धांजली असेल असे सांगून, शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतो, तेव्हा विजयापासून सेनेला कोणी रोखू शकत नसल्याचे ते म्हणाले.शाब्दिक बाचाबाचीजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या सेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांना पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी अडविल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. या वेळी कबाडी यांनी शिवीसदृश शब्द वापरल्याने, दालनात त्याचे पडसाद उमटले. याचा जाब कबाडींना विचारे यांनी विचारला असता, गैरसमजुतीमधून हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.शिवसैैनिकांविरुद्ध गुन्हासेनेचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान १०० मीटर प्रतिबंधित भागात प्रवेश करून सभा घेतल्याने ५० शिवसैैनिकांविरोधात सातपाटी सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार महेश सागर यांनी दिली. यादरम्यान, आचारसंहिता भंग करण्यात आली आहे का? याचाही तपास संबंधित यंत्रणा करीत आहे.दामू शिंगडा यांना काँग्रेसची उमेदवारी - अशोक चव्हाणमुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने माजी खासदार दामू शिंगडा यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली असून त्यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिली.भाजपाने पैसा व सत्तेचा गैरवापर करून नेत्यांची पळवापळवी सुरू केली आहे. गावित यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असला तरी काँग्रेसशी गद्दारी करणाºया गावितांना पालघर मतदारसंघातील जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.चव्हाण म्हणाले, गावित गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात होते. काँग्रेसमध्ये राहून त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. शिवसेनेने भाजपा उमेदवार पळविला, म्हणून भाजपाने गावितांना जवळ केले. सर्वांत मोठा पक्ष अशा वल्गना करणाºया भाजपाला स्वत:चा एक उमेदवार मिळू नये, हे लांछनास्पद आहे. पक्षनिष्ठा वगैरे प्रकारच शिल्लक नसल्याचे गावितांच्या पक्षांतराने अधोरेखित झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.राजेंद्र गावित दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळणार नाही, याची पूर्वकल्पना त्यांना निश्चितच होती. अशा पडेल उमेदवाराला घेऊन भाजपाने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. जनता अशा पडेल उमेदवाराला आणि भाजपाला पुन्हा तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी या वेळी केली. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018palgharपालघरnewsबातम्या