शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पालघरमध्ये गतवर्षात १,७५५ आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:58 IST

जिल्ह्यात वर्षभरात घडले ८५६ गुन्हे; वसई वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत गुन्हेगारी घटली

- हितेन नाईकपालघर : पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत १ जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ८५६ गुन्हे नोंदविण्यात आले असून १ हजार ०७५५ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी सुमारे ५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्यात अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील १९ कोटी ६८ लाख २३ हजार ९९९ रुपयांचा आणि चोरटी रेती वाहतूक गुन्ह्यातील १४ कोटी ६१ लाख ५५ हजार ७५८ रुपयांच्या किमतीच्या ऐवजाचा समावेश आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या बोधचिन्हाचा सन्मान राखीत जिल्ह्यात पालघर पोलिसांकडून कडक कारवाईचा बडगा उचलण्याचे काम जोराने सुरू आहे. वसई तालुका वगळता इतर तालुक्यांतील गुन्हेगारीच्या प्रकरणाचे प्रमाण कमी असून पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे.जिल्ह्यातील नदी, नाले, खाड्यांतून सक्शन पंपाद्वारे चोरट्या पद्धतीने करण्यात येणारा रेतीचा उपसा पाहता पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी रेती-माफियांना जरब बसावी म्हणून पोलीस अधीक्षक गौरव सिंग हे स्वत: या कारवाईत उतरले होते. रेती चोरांविरोधात ११२ गुन्हे दाखल करून १४ कोटी ६१ लाख ५५ हजार ७५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत २६३ आरोपींवर कारवाई केली होती.जिल्ह्यातील बहुतांशी भागात मादक द्रव्याचे छुपे वितरण करण्यात येत असून तरुण वर्ग या मादक द्रव्याच्या आहारी जात आहे. यांना रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणी ११८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून १९ कोटी ६५ लाख २३ हजार ९९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतु ही कारवाई तोकडी पडत असून मादक द्रव्याच्या वितरणाचे लोण आदिवासीबहुल गाव-पाडे, किनारपट्टीवरील गावातही पोचले असल्याने व्यसनाधीनतेकडे वळणाºया तरुण पिढीला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी ही कारवाई कडकपणे राबविण्याची मागणी केली जात आहे. याच बरोबरीने तरुण वर्गात आवडीचा ठरलेला, परंतु आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरलेल्या गुटख्याची विक्री सर्रासपणे पानटपरीपासून ते छोट्या-मोठ्या दुकानात राजरोसपणे सुरू असून या गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी गुजरात राज्यातून बेकायदेशीपणे पालघर, ठाणे व मुंबईकडे चोरट्या पद्धतीने नेण्यात येणाºया १८२ आरोपींविरोधात १२१ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून १२ कोटी ८८ लाख ३२ हजार ४५३ रुपये किमतीचा मुद्देमाल एका वर्षात जप्त करण्यात आलेला आहे. अवैध दारू विक्री आणि वाहतूक करण्याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार ६८९ आरोपींविरोधात कारवाई करून त्यांच्यावर ६७३ गुन्हे दाखल करण्यात आले. यात अवैध दारू आणि वाहने असा २ कोटी ४९ लाख ७१ हजार ४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जुगाऱ्यांकडून ५८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्तपालघरमध्ये ४३६ जुगारी आरोपींविरोधात ७७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८ लाख २५ हजार ३८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यानुसार ११८ आरोपींविरोधात ८५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून १९ कोटी ६८ लाख २३ हजार ९९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, तर पिटा कायद्यानुसार १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३६ आरोपींवर कारवाई करून एक लाख १७ हजार ७४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आर्म अ‍ॅक्टनुसार २९ आरोपींविरोधामध्ये १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२ लाख ६३ हजार ३८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.