हितेन नाईक, पालघरपालघर जिल्ह्यातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या करण्यात आलेल्या कायापालटानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत रूग्णालयात प्रसूतींचे वाढलेले प्रमाण, माता व बालमृत्यूचे घटलेले प्रमाण इ. सह आरोग्यसेवा पुरविण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या ४८ निकषांचे उत्कृष्ट पालन करून पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अन्य तीन जिल्ह्यासह राज्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकाविला आहे.नवनिर्मित पालघर जिल्ह्याची १ आॅगस्ट २०१४ रोजी स्थापना करण्यात आल्यानंतर १ सप्टेंबरला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाची सुरूवात झाली. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यामध्ये ९ ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३०४ उपकेंद्रे, ३१ वैद्यकीय मदत पथके, १८ प्राथमिक आरोग्य पथके तर ८ जिल्हापरिषदेचे दवाखाने आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा पुरविली जाते. यामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमातंर्गत शस्त्रक्रिया, तांबी बसवणे, दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया, जननी सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, मातामृत्यू व बालमृत्यू प्रमाणात झालेली घट इ. बाबत अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. संतोष गायकवाड व त्यांच्या टीमने पूर्ण जिल्ह्यात केली होती.
आरोग्य सेवेत पालघर प्रथम
By admin | Updated: January 6, 2016 01:01 IST